विषकन्या योग व वैधव्य योग हर कुंभ विवाह याबद्दलची माहिती
विषकन्या योग
सूर्य भौमिर्किवारेषुमिथी भद्राशतभियम् । आश्लेषा कृत्तिका नामे मत्र ज्ञाता विषांगना ।।१।।
सूर्य, मंगळ, शनिवार हे वार असून भद्रातिथी (२,७,१२) असेल त्याप्रमाणे कृत्तिका, आश्लेषा, मुळ, शततारका नक्षत्र जर असल्यास अशा समयी पूर्ण योग असतांना एखादया मुलीचा जन्म झाल्यास विषकन्या योग होतो.
(खुलासा = वार, तिथी, नक्षत्र असे तीन मिळूनच विषकन्या योग होता.)
जर्नुलग्ने रिपुक्षेत्रे सांस्थित: पापखेचर: । द्विसास्मापि योगेsस्मिन सन्जाता विषकन्या ।।२।।
जन्म लग्नात शत्रुक्षेत्री पापग्रह असेल त्याचप्रमाणे त्यासंबंधी प्रथम श्लोकांप्रमाणे कोणतेही दोन योग होत असल्यास ती कन्या विषकन्या योगी होते. (खुलासा = वरील विधानाला अनुसरून त्याला जोडून वार, तिथी, नक्षत्र ह्या तीन पैकी दोन योग होणे आवश्यक आहे)
लग्ने शनिचरो यस्या सूतेर्को नवमे कुंज । विषायव्या सापि नौद्वाहया त्रिविध विषकन्या ।।३।।
ज्या मुलीच्या लग्नी शनी असून पंचम भावात सूर्य असेल त्याचप्रमाणे नवम स्थानाम मंगळ असेल तर ती कन्या विषकन्या होऊ शकते. त्यावरील प्रमाणे तीन प्रकारचे विषकन्या होऊ शकते. त्यावरीलप्रमाणे तीन प्रकारचे विषकन्या योग सांगितलेले आहेत. गुजरात व राजस्थानात वरील आशयासंबंधी एका दंतकथेच्या म्हणीचा अर्थ पुढे देत आहे.
विषकन्या योगात जन्मलेली कन्या जिवंत रहात नाही. जरी जन्म झाल्यास अल्पायुषी असते. नाहीतर पुर्ण कुंटुबाला नष्ट करते किंवा पीडा देते. विवाह संस्कारचे वेळी (हवनकुंडाला फेरे घेतांना ) वराला नष्ट करते. जरी विवाह झाल्यास प्रत्यक्ष ब्रम्ह, विष्णु, महेश येतात. अर्थात विषकन्येचा विवाह नेहमी कष्टमय होत असतो. जर अशा मुलीच्या कुंडलीत अशा प्रकारचे योग असल्यास त्याचा परिहार हा ''कुंभविवाह' ने खचितच दूर होतो.
विधवा योग
१) ज्या मुलीच्या कुंडलीमध्ये सप्तम भावात मंगळ पापग्रहांसह युक्त असेल किंवा पापग्रह सप्तम भावात मंगळ त्यास पूर्ण दृष्टीने पहात असेल तर अशी कन्या तरूणावस्थेत पोहोचण्यापूर्वीच बालविधवा होते.
२) चंद्रापासून सामवे किंवा आठवे स्थानी पापग्रह असल्यास किंवा मेष अथवा वृश्चिक या दोघे राशीना राहू आठवे किंवा बाराव्या स्थानी असल्यास अशी कन्या निश्चित विधवा होते. (खुलासा = हा योग फक्त वृषभ, कन्या, धनु, हा लग्नालाच लागु पडतो)
३) मकर लग्न असल्यास त्याच्या सप्तम भागात कर्कराशी गत सुर्य-मंगळाबरोबर असल्यास अथवा चंद्र पापग्रह पीडीत असल्यास वरील योग बनतो. अशी स्त्रीसुध्दा विवाहानंतर मध्यावस्थेत विधवा होते.
४) लग्न तसेच सप्तम या दोन्ही भावात पापग्रह असल्यास स्त्रीसुध्दा विवाहोत्तर काळात वैधव्य प्राप्त होते.
५) सप्तम स्थानात पापग्रह असुन तसेच चंद्र षष्ठ किंवा सप्तमात असल्यास विवाहानंतर वयाच्या मध्यात वैधव्य प्राप्त होते.
६) जर अष्टमाधिपती सप्तम भावात असून सप्तमेषाला जर पापग्रह पहात असेल तसेच सप्तमभाव पापग्रह पीडीत असेल तर नववधू लवकरच विधवा होते.
७) षष्ठ व अष्टम स्थानाचे अधिपती जर षष्ठ किंवा बाराव्या भावात पापग्रहाबरोबर असून सप्तम भावावर कोणत्याही शुभ ग्रहाची दृद्वटी नसल्यास नववधुस सुध्दा लवकर वैधव्य प्राप्त होते.
८) लग्नापासून सप्तम, अष्टम स्थानाचे स्वामी पापग्रह पीडीत असून जर ते सहा किंवा बाराव्या स्थानी जरी असल्यास निश्चितच वैधव्य योग होतो.
यदिलग्नगत: कुरस्तमाम् सप्तमग: कुंज । विषेयम् मरणम् पुंसाम ।।१।।
यदि लग्नतश्चस्तस्मात् सप्तम/ कुंज: । मृत्यु विज्ञानीयान ।।२।। (नारद)
वरील दोन्ही श्लोकांचा अर्थ असा आहे की, जर मुलीचा जन्म लग्नामध्ये सप्तमेश पापी असेल किंवा पापदृष्ट असेल अथवा पापग्रहयुक्त असून अनिष्टकारी (६,८,१२) स्थानात असेल किंवा शत्रुगृही असेल तर पतिसुखास हानी करतो. त्याचप्रमाणे लग्नामध्ये आणि त्यापासून सप्तमस्थानी मंगळ असेल अथवा लग्नात चंद्र असून त्याच्या सप्तमात मंगळ असल्यास पतिसुखास हानी करतो.
लग्ने व्ययेच पाताले जामित्रेचाष्टमे कुंज: । कन्या भर्तुविनाशाय भर्ता विनाशकृंत ।।
अर्थात कुंडलीमध्ये लग्नात (प्रथम), चतुर्थात, सप्तमात, अष्टमात व व्ययात (बारावे) ह्यापैकी एका स्थानात मंगळ असल्यास पति सुखास हानी करतो (खुलासा = वरील ह्या श्लोकात मंगळाचा ऐकेरीच पध्दतीने विचार केलेला आहे. ह्या मंगळाचा विचार करतांना त्याच्या सर्व बाकी घटकांचा विचार प्रथम जरूर करावा.)
कृष्णमुर्ती पध्दतीने दोन विवाह योग विचार
सप्तमभावात उपनक्षत्र स्वामी २ किंवा ७, ११, ह्यापैकी एका वा तिन्ही भावांचा बलवान कार्येश असून तो कार्येश ६ किंवा १२ दोनही भावांचा असेल तर अपेक्षित वैवाहिक सौख्य प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे तो उपनक्षत्र बुध असेल वा बुधाच्य नक्षत्रात असेल अथवा बुधाच्या राशीत असेल किंवा द्विस्वभाव राशीत असून २ किंवा १२ ह्यापैकी एका भावाचा बलवान कार्येश असल्यास एकापेक्षा जास्त विवाह योग होऊ शकतो.
विषकन्या भंग योग
षुमेपे ता शुभेस्ते विषारखान ।
सप्तम स्थानात स्वत: सप्तमेशात विराजमान असुन जरी तो पापग्रह दृष्ट असला तरीही तो शुभ ग्रहाबरोबर असेल तर विषकन्या योग भंग पावतो. सप्तमस्थानात हे पतिचे स्थान असल्याने त्यावरुन पति सुखाचा विचार होतो ही गोष्ट सदैव लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, सप्तमात शुभग्रह असल्यास किंवा सप्तमावर शुभग्रह पहात असल्यास त्याच्या प्रभावाने पतिसुखात निश्चितच वाढ होईल. ह्या विषयासंबंधी श्री. कल्याण वर्मा यांनी त्यांच्या सारावलीत असे म्हटले आहे.
वैधत्व निधने चिन्त्यं, शरीर जन्मलग्नत: । सप्तमे पति पंचमे प्रसवस्था ।।
(सारावली स्त्री जातक)
पुरुषांच्या अष्टम भावावरून ''विधुरता'' तसेच स्त्रीयांच्या अष्टम भावावरून ''वैधव्यता'' चा विचार केला जातो. सप्तमावरुन स्थिती, संपदा, वैभव तसेच पतिच्या सौभाग्याचा विचार होतो. पंचमावरून मुला-मुलीचा स्थितीचा विचार दिसतो. त्यासाठी येथे पण पति सौभाग्य सुख हेतु स्त्रीच्या भावाला अनन्यसाधारण प्राधान्य दिलेले आहे. विषकन्या योग व वैधव्य योग ह्यावर परिहार विधान ह्या सर्व प्रकारच्या वैधव्य दोषाच्या निवृत्ती हेतू धर्मशास्त्र असे सांगते.
सावित्र्यादिव्रतं कृंत्य वैधव्यदिनिवृत्तये । अश्वत्थादिभिद्वाह्या दधानां चिजीवने ।।१।।
बाल वैधव्ययोगे तु कुंभादुपतिमादिभि: । कृंत्वा तत: पश्चात कंन्योहयेति चापरे ।।२।।
वटसावित्री व्रतकथा, अश्वस्थ (पिपळ) वृक्षाशी लग्न, तसेच कुंभ विवाह जर पहिले नंतर अन्य कोणाशी (पुरूष) विवाह केला तर कुंभ विवाहाने असलेला वैधव्य योग नाहीसा होतो.
त्याच्रप्रमाणे ''हेमाद्री व्रमखंड'' यामध्ये ''वैधव्य - योग नाशक सावित्रीव्रत'' असे सांगितलेले आहे की, सावित्र्यदिव्रतादिनी भक्तव्या कुर्वन्ति या: स्त्रिया । सौभागयंच सुहत्वंच भवेत् तासां सुसंगति: ।।
ज्या मुलीच्या कुंडलीत विधवायोग असल्यास तिच्या आई-वडिलांनी तिच्याकडून एकांतात ''सावित्री व्रत'' किंवा ''पिपंळव्रत'' करवून नंतर दिर्घाय वरा वराबरोबर विवाह करावा.
नारी वा विधवा पुत्रीपुत्र विवर्जिता । सभर्तुका सुपुत्रा वा कुर्याद व्र तभिंद शुभम ।।
(स्कंद पुराण )
वरील व्रत हे सुध्दा सौभाग्यवती, विधवा, कुमारी, वृध्दा सुपुत्रविति किंवा पांझोटी ह्या सर्व स्त्रीयांन हे व्रत करण्यासारखे आहे. दुसरे असेच व्रत (ज्ञानभास्कर) ह्या ग्रंथात सांगितलेले आहे. त्यास ''वैधव्य हर अश्वत्थव्रत'' असे नाव आहे. यामध्ये मुलींच्या आई - वडिलांनी आपल्या मुलीकडुन सुमुहूर्तावर ठरवून रंगीत वस्त्र परिधान करून ब्राम्हणाकडुन संकल्प आई-वडिलांद्वारे करावा. हे व्रत महिनाभराचे आहे. हे व्रत विशेषत: चैत्र वद्य तृतीया किंवा आश्विन वद्य तृतीया ते आगामी वद्य तृतिये पर्यंत हे व्रत चालू ठेवावे. यामध्ये बांबूच्या टोपलीमध्ये सुवर्णमयी (सोन्याची) शिवपार्वतीची मुर्ती यथोचित पूजन करून त्यांना ते दान करावे. ही पुजा रोज पिपंळाच्या झाडाखालीच झाली पाहिजे. जर पिपंळाचे झाड नसल्यास शमी अथवा बोराचे झाडाखाली केली तरी चालेले. अशा प्रकारे प्रतिदिनी महिन्यापर्यंत केल्यास पूर्ण पतिसौख्य प्राप्त होते.
वैधव्यहर कंर्कटीव्रत
''व्रतराज या ग्रंथामध्ये हे एक आणखी व्रत सांगितलेले आहे. सुर्य जेव्हा राशीत प्रवेश केल्यानंतर मुलीने स्नान करून अथवा (तांदूळ) चे अष्टदल करून सोन्याची कर्कटी (काकडी)ची स्थापना करून मनोभावे षोडशोपचार पुजन करावे. विधिवत व्रत करून अकरा काकडी (ऋतुकाळातील काकडी) सहीत सुवर्ण कर्कटी (काकडी)चे दान ब्राम्हणभोजन करावे. या व्रताने वैधव्य योगाची शांती होते.
त्याचप्रमाणे ''मार्कण्डेय पुराण'' ह्या पुराणात ''कुंभविवाह'', ''विष्णूविवाह'' हे तील परिहार व्रत दिलेले आहे. ह्या तीनही विवाहांमध्ये ''गणपतिपुजन'', ''मातृकापूजन, ''वर्सोधारापूजन'', ''नांदीश्राध्द'', ''सुवर्णमयी विष्णुपूजन'', ''होमहवादि'' करवून पुढे कर्मे करावे.
अर्क विवाह
ज्याप्रमाणे स्त्रीयांच्या कुंडलीत ''विषकन्या योग'' आणि वैधव्य योग असतो. त्याचप्रमाणे पुरूषांच्या कुंडलीत ही ''विषपुत्र योग'' व ''विधुर योग'' ही असतो. ज्याप्रमाणे स्त्रीयांच्या कुंडलीत ''वैधव्य योग'' पहातो. त्याचप्रमाणे तेच नियम पुरुषांच्या कुंडलीत ''विधुर योग'' पहावा. जर एखाद्या पुरूषाचा विवाह एका पेक्षा जास्त विवाह होऊनही जर पत्निसुख प्राप्त होत नसेल तर अशा पुरुषाला अर्क (रूई)च्या झाडासोबत विवाह करवून त्यानंतर दुसर्या कन्येशी विवाह करावा. कुंभविवाहाच्या प्रमाणे हा ''अर्क विवाह'' पण शास्त्रसंमत सप्तमभावाचे जन्मदोष व अरिष्ट निवारणाचा उत्तमोत्तम परिहार आहे.
मुहूर्त कालविचार
आदित्य दिवसे वापि हरपक्षे वा शनिश्वरे ।।
''अर्क विवाह'' हा रविवारी, शनिवारी किंवा हस्त नक्षत्रावर तसेच शुभ दिवशी हा विधी करावा.
संकलन - भूषण सांभ शिखरे (पवईकर)