शिखरे गुरुजींविषयी
शिखरे हे एक पुजारी कुटूंब गत १२०० वर्षांपासून त्र्यंबकेश्वर येथे निवास करीत आहे. त्यांचे मुख्य काम म्हणजे विविध धार्मिक विधी करणे. कै. श्री. शंकर सखाराम शिखरे ह्यांनी गेल्या शतकात स्वत:ला पौरोहित्याच्या व्यवसायासाठी संपूर्णपणे वाहून घेतले होते. त्यांचे सुपूत्र कै. श्री. सांभ शंकर शिखरे आपल्या वडिलांच्या पौरोहित्यांच्याच परंपरागत व्यवसाय पस्तीस वर्षांपासून त्रिबंकेश्वरी सांभाळला. ते हिंन्दू धर्माच्या सर्व पूजा विधी, नारायणबळी, नागबळी पुजा, कालसर्पशांती पूजा, त्रिपिंडी श्राध्द आदी करून घेण्यात निष्णात आणि कुशल आहेत.
त्यांचा मुलगा श्री. भूषण सांभ शिखरे हे सुध्दा त्यांच्या कुटुंबियांच्या परंपरा गेली पंधरा वर्षे कुशलतेने सांभाळीत आहेत. पौरोहित्याच्या परंपरंपरेशिवाय श्री. भूषण शिखरे फल ज्योतिषातही रस घेतात. हा उत्साही पुरोहित प्रसिध्द फलज्योतिष शास्त्रज्ञ श्री. के. एस. कृष्णमूर्ती पध्दतीचा अनुयायी आहे. म्हणजेच के.पी परंपरेला अनुसरून पौरोहित्य करणारा आहे. श्री. भूषण शिखरे ह्यांनी भारतीय पारंपारिक फलज्योतिष शास्त्राच्या काही पारंपारिक अडचणींमुळे त्यांनी आपला रोख के.पी. परंपरेकडे वळविला.
भारतीय ज्योतिषशास्त्र आणि के. पी. पध्दती
भ्रारत विविध परंपरा, पुराण, वेद, वैभ्रव संपन्न संस्कृती उत्कृष्ट विचारशक्ती असलेल्याचा आणि स्वर्गीय स्मृती सौंदर्य देश आहे. हा देश वैभव संपन्न आदर्श पुराण कथांचा देश आहे, ह्या कथांमधून विश्व, विश्व उत्पत्ति, विश्वाचा उदय आणि अंत, विविध महान देवता आणि श्रेष्ठ ऋषी मुनी, संताच्या प्रसिध्द कथांचे सविस्तर वर्णन आहे. ह्या देशाची मंदिराची उत्कृष्ठ व्यवस्थापन व्यवस्था जगासाठी अनवार्य असा एक जनादेशच आहे.
ह्या देशाने जगाला 'शुन्याची' (०) देणगी दिली. थोर गणितज्ञ 'कणाद' आणि 'आर्यभट्ट', महान महिला 'लिलावती' ह्यांनी आपल्या विश्वाला गणितातील अनेक समीकरणे बहाल केलेली आहेत. ह्या देशातील महान ज्योतिषींनी फलज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास करून कित्येक प्रसिध्द फलज्योतिषी ह्या देशाला दिलेले आहेत.
आपले जुने पारंपारिक फलज्योतिष शास्त्र आपल्याला नक्षत्र, त्यांचा वेग आणि स्थान इत्यादी गोष्टींवरून जन्म कुंडली विषयी सविस्तर माहिती देते. आजचे आधुनिक विज्ञानाने सिध्द करून दिले आहे की इजिप्तचे पिरॅमीड, मलेशियातील देवळे आणि भारतातील अनेक मंदिरे दहा हजार वर्षांपूर्वी नक्षत्र आणि तार्यांच्या स्थानांचा अभ्यास करून बांधली होती, म्हणूनच आम्हांला आमच्या शिल्पांचा आणि फलज्योतिषशास्त्राचा अभिमान वाटतो.
आता तर ह्या शास्त्रात नवीन तारा के.एस. कृष्णमुर्तिच्या रुपांत जन्मला आहे. प्रसिध्द फलज्योतिषी के. एस. कृष्णमुर्तिंनी हिन्दु पुराणाचा, गणिताचा आणि ज्योतिष शास्त्राचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्यांनी ज्योतिष शास्त्राची आपली स्वत:ची अशी एक पध्दत शोधून काढली आहे. त्यांनी मनुष्य जीवनाच्या प्रत्येक समस्येवर गहन अभ्यास केला आणि त्याचा संबंध नक्षत्र, तारे आणि संख्यात्मक वर्णमाला म्हणजे क्रमांक एक ते दोनशे एकोणपन्नास (१ ते २४९) शी जोडला आहे.
त्यांच्या या यशस्वी पध्दतीमुळे फलज्योतिष वर्तविणे सोपे झाले आहे. त्यांच्या ह्या पध्दतीलाच के.पी. पध्दती म्हणतात.
फल ज्योतिषशास्त्र आणि जन्मकुंडली
१. के. पी. पध्दती प्रमाणे भविष्य वर्तविणे दोन वेगवेगळया प्रकाराने करता येते.
३. प्रश्न कुंडली पध्दतीत तुम्हाला क्रमांक एक ते दोनशे एकोणपन्नास ह्या संख्यांमधील कोणतीही एक संख्या विचार न पटकन निवडायची असते.
४. कोणताही प्रश्न वा समस्या विचारण्यापूर्वी तुमचे लक्ष महत्त्वाच्या विचारणार्या प्रश्नाकडेच केद्रिंत झाले पाहीज आणि तोच प्रश्न प्रामुख्याने पटकन विचारला गेला पाहिजे.
५. प्रश्न विचारण्यापूर्वी श्रध्दापूर्वक देवाची आणि आई-वडिलांची प्रार्थना करा.
६. गंभीर प्रश्न वा समस्या ज्या इस्टेटीच्या संदर्भात, धंद्याच्या संदर्भात, व्यवसाय बदलण्याच्या संबंधात, व्यापार उद्योगाच्या संबंधात, कौटूंबिक जीवनाच्या संदर्भात असतील त्या सर्व समस्या वा प्रश्न कुंडलीच्याद्वारे सोडवता येतात.
७. ज्योतिषाचे भाकित वर्तवतांना आम्ही त्र्यंबकेश्वर स्थानाचे अक्षांश आणि रेखांश ह्यांचा ही विचार करतो.
८. प्रश्न कुंडली पध्दतीत प्रत्येक प्रश्न वा प्रत्येक समस्या स्वतंत्रपणे वेगळी संख्या घेऊन सोडवली जाते.