सिंहस्थ महापर्वणी

हे गंगे!

अब त्वद्दर्शनान्मुक्ति: न जाने स्नानजं फल

गंगेमुळे विश्व तीर्थरुप बनते।
सिंहस्थ म्हणजे सूर्य, चंद्र व गुंचा त्रिवेणी संगम!
वृध्दगोदेला भेटण्यासाठी विश्वनाथासह गंगा कुशावर्तात येते,
गंगालहरी व गोदालहरीचे ऐक्य कुशावर्तात होत, म्हणून जग्न्नाथ पंडितांनी निराळी गोदालहरी लिहिली नाही

सिंहस्थ कुठे? नाशिकला की त्र्यंबकेश्वरला?
गंगेचा काठ व घाट नाशिकला पण मूळ त्र्यंबकेश्वरला आहे.
मूळगंगेत स्नान केले की, शंकांचे व प्रश्नांचे तर्पण होते.
भगवंतांचे चरणतीर्थ गंगा आहे. लीलातीर्थ यमुना आहे, ह्दयतीर्थ
सरस्वती आहे तर त्या त्रिवेणीला हसरा गजरा गोदावरी आहे
संतांच्या स्नानाने गोदा पापमुक्त होते.

ज्ञानेश्वरांचे गुरूमंदिर त्र्यंबकेश्वर, ध्यानमंदिर पंढरपूर तर
समाधिमंदिर आळंदी आहे.
शाही मिरवणूक ज्ञानाची शोभयात्रा आहे
भोगातील नग्नता रोग तर ज्ञानातील नग्नता योग आहे.
देहभिमानाचे वस्त्र सोडण्यासाठी ही मिरवणुक आहे.
साधूंच्या हाती शस्त्र कशाला? शास्त्ररक्षणासाठी धर्मरक्षणासाठी!!!
धर्म, ज्ञान, वैराग्याचा रंग भगवा!! भोग्यांना भगवा आवडत नाही,
योग्यांना लाल (अनुराग रंग) आवडत नाही.
ज्ञानाच्या मानसरोवरात स्नान करणार्‍या 
परमंहंसांचा देश भारत आहे.

सिहस्थ परमहंसांचा पर्वकाल आहे
त्या अपुर्व पर्वणीपरमहंसांना आमचे अनंत प्रणाम!!!

श्री
।। सिंहस्थ महापर्वणी एक दार्शनिक विश्लेषण ।।
।। कुशावर्त समं तीर्थ नास्ति ब्रम्हांड गोलके ।।

त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे ते पांडवांचे धर्मक्षेत्र आहे. कौरवांचे कुरूक्षेत्र आहे. येथे पुण्यपापांचे युध्द चालते. पराभूत झालेली पापे याच क्षेत्रात आपला देह ठेवतात. स्वर्गमोक्षांचे मळे पिकविणारे रोपे फुलतात. संत येथेच पुण्याची लावणी व आवणी करतात. अधार्मिक येथेच दंभाचे खत वापरून पापांचे हायब्रीड पीक काढतात. शुगर कोटीग पापांचे बेचव पीक जाळणारी तपोभूमीही त्र्यंबकच आहे. या भूमीचा प्रभाव अदभूत आहे. येथील जमिनीच्या कणाकणात पुण्याचे बीज खेळते या पुण्यविद्दुतला अणुरेणुत खेळते. कणांकणांत झिम्माफुगडयांचा नाच करते. ही वीज मनाच्या सिलिंगमध्ये असते. वृष्टि विजेची बहीण आहे. या दोघी धर्ममेघाच्या मुली आहेत. ही पुण्यभूमी आहे, धर्मभूमी आहे, तपोभूमी आहे.

।। सलिलस्यच अद् भुतात प्रभावात ।।

गंगा, ब्रम्हदेव आणि धर्मद्रव आहे. येथील पाणी तीर्थरूप आहे. गंगा ब्रम्हदेवाच्या कमंडलुतले धर्मसंपादक आद्य जल आहे. या कमंडलूजलाने ब्रम्हदेवाने आचमन केले, तेच जल भगवान शंकराच्या जटेत आले. तेच गंगाजल जान्हवी झाले. पुढे तीच जलधारा विष्णूंच्या चरणारविंदातले तीर्थ बनली. कारूण्याने झालेले हे गंगेचे भूमीवरील अवतरण अदभूत आहे. शंकराच्या ह्दयातील ही करुणातरंगिणी कृतयुगात गोदेच्या रुपाने व त्रेतायुगात गंगेच्या रूपाने अवतरली. शंकराच्या उत्तमांगावरून ही निघाली व खाली येऊन तिने वसुंधरेला सर्वांग अलिंगन दिले. पापांचा पाया खणणारे हे पाणी पुण्यकृंपण नाही. याचा प्रभाव अदभूत आहे. पवित्रसलिला, पुण्यतरला, सर्वमंगला अशी ही गंगा धर्मतंरगिणी आहे.

हिच्या आचमनात ब्रम्हांडाचे आपोशन घेण्याची शक्ती दडली आहे. त्रैलोक्याच्या चित्रोहुति व महापातकांच्या पंचप्राणहुति घेवूनच हिचा भोजन यज्ञ पूर्ण होतो. मनाने यति व वृत्तीने ययाति बनून जेव्हा आमची परमार्थाची पुण्ययात्रा सुरू होते. तेव्हा गंगेचे जलबिंदू आमच्या पंचकोषांना पावन करतात. ही गंगा तुकारामांच्या अभंगात शिरली व इद्रायणीने गंगेला घाबरून तुकारामांचे अभंग परत केले. संत तुकारामांचे अभंग गंगेचे तरंग आहेत. वेदार्थ गाणार्‍या तुकोबांचे अभंगात ज्ञानेश्वरांच्या ह्दयातल्या प्रणवध्वनींचा अनाहत नाद ऐकू येतो. वेदगंगेच्या काठावर व नांदगंगेच्या घाटावर वसंत फुलला अशी ही ज्ञानगंगेची बहीण मूळगंगा आहे.

गंगेचे अदभूत तेज । गंगेच्या प्रावहाचे ज्यातिर्मय स्वरूप !

ज्योर्तिलिंगाच्या जटेतून निघालेली ज्योतिष्मती जलधारा गंगा आहे. सूर्य, चंद्र व अग्नी यांनीच आपले पापदाहक ज्ञानप्रकाशक तेज गंगेत सोडले.

तीर्थ ब्राह्य मळ क्षाळे । सत्कर्मे अभ्यंतर उजळे ।।

सत्कर्मे हीच तीर्थ आहेत. सत्कर्म व स्वधर्माने अंर्तमन प्रक्षालन होते. शुचिता येते. गंगेच्या तीरावरील तपाने तेज वाढते. तप्त कांचनसारखी काया होते. गायत्रीपुरश्चरणानेही तेज वाढते. अधमर्षणही शुध्दतेचेच अंग आहे.

careful
apps-banner
यजमान आणि यात्रेकरुकरीता महत्त्वाची माहिती      
© Copyright 2015 All rights reserved at Shikhare B. S.