नारायणबळी - नागबळी

नारायणबळी आणि नागबळी हे दोन धार्मिक विधी काही इच्छा पूर्ततेसाठी केले जातात म्हणून ह्या तिघांना काम्य विधी म्हणतात.

अपत्य प्राप्तीसाठी

nagnarayanbali

एखाद्या दांपत्याला अपत्य होत नसेल तर त्या दांपत्याला दुर्देवी मानले जाते. समाजातील माणसे अपत्यहिन व्यक्तींचे भल्या पहाटे मुख पहाण्याचे टाळतात म्हणून प्रत्येक दांपत्याची एकच इच्छा असते की त्यांचे एक तरी मुल वा अपत्य असावे. अपत्याशिवाय कौटुंबिक जीवनही अर्धवट वाटते. मुलांसाठी प्रेम, वात्सल्य ह्या भावना नैसर्गिक आहेत आणि ह्या भावनांची पुर्तता न झाल्यास मनुष्य दु:खी होतो. एक वेळ गरिबी परवडते. आर्थिक सुबत्ता नसली तरी चालते पसंतु अपत्य सुख मात्र प्रत्येक दांपत्याला हवहवेसे वाटते. आजच्या आधुनिक युगात अपत्य प्राप्तीसाठी टेस्टटयुब पध्दतीचा उपयोग केला जातो. दांपत्य कर्ज काढून, परवडत नसले तरी आधुनिक उपाययोजना करवून घेतात. परंतु विविध प्रयत्नानीही सकारात्मक परिणाम मिळत नाहीत तेव्हा निराशेनेच अशी मंडळी फलज्योतिषाकडे धाव घेतात. फलज्योतिषी वैद्यकिय उपायांच्या, अपयशाचा अभ्यास करतात. दांपत्याच्या वैवाहिक विषयी जीवनात दोष नसतील तरच फलज्योतिषही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. कारण रोग असला तर त्याचा उपायही सापडतोच हा नियम लक्षात ठेऊन आमच्या पुर्वजांनी ज्योतिषशास्त्रात उपाय नमूद केलेले आहेत. त्यामुळे अपत्यहीनांच्या समस्या सुटू शकतात. प्रथम फलज्योतिषी पती पत्निच्या जन्मकुंडलीचा सखोल अभ्यास करतात की अपत्य प्राप्तीची संभावना आहे की नाही. नंतर अपत्य प्राप्ती का होत नाही याचे नेमके कारण शोधुन काढण्याचा ते प्रयत्न करतात. त्या कारणांमध्ये पुढील काही महत्वाची कारणे आहेत.

 • पुर्वजन्माचा शाप
 • पिशाच्याच्या त्रासातून मुक्ति
 • निर्वेश योग इत्यादी (निपुत्रिक योग)

ज्यावेळी त्यांचा पक्का निर्णय होतो त्यावेळी ते नारायणबळी-नागबळी ह्या विधीची विधिवत पूजा करण्याचा सल्ला देतात. ह्यानंतर हा विधी व्यवस्थितपणे पार पाडला की अपत्य प्राप्तीची विधी पार पाडणार्‍या दांपत्याला संधी मिळते असा अनुभव अनेक दांपत्यांना आलेला आहे. म्हणून दांपत्याच्या जन्मकुंडलीचे अभ्यास परिक्षण आवश्यक आहे. त्यानंतर दोघांचीही वैद्यकीय तपासणी कुशल डॉक्टरांकडून करणेही आवश्यक आहे. वैद्यकीय तपासणीला नारायण-नागबळी ह्या धार्मिक विधीचाही व्यवस्थित जोड मिळाला तर दांपत्याला अपत्य प्राप्ती झाल्याशिवाय राहाणार नाही. नशिबाला प्रयत्नांची जोड तर हवीच.

अपत्यांचे महत्व

मानवाचा गृहस्थाश्रम संततीशिवाय सफल होत नाही. तो गृहस्थाश्रमातील सौख्याचा ठेवा 'कुलदिपकपुंज' मानला जातो. म्हणूनच महाकवी भवभूतीने म्हटले आहे की,

अंत:करण तत्वस्य दंपत्या: स्नेहसंस्त्रवात् ।
आनंदग्रंथी रेकीयं अतत्यमिती पढयंते ।।
यस्य वै मृत्युकाले तु व्युच्छिन्ना संततिर्भवेत ।

ऐहिक सुख व पारलौकिक गति ह्या दोन्ही अपत्यलाभानेच मिळतात. या लोकी नानाविध दु:खांनी मनुष्य पोळला जातो. ज्यावेळी शरीरातील दोष हे कारण नसतांनाही संतती प्राप्त होत नाही. अजिबात संतती नसणे, पुत्र नसणे, जिवीत संततीस आरोग्य नसणे, शरीरास कायम रोग पीडा असणे, योगक्षेम व्यस्थित न चालणे, यांस अदृष्ट कारण परंपरा असलीच पाहिजे याचा विचार त्यांनी प्रथम करून ती प्रथम नमूद केली आहेत.

 • या जन्मी केलेल विशिष्ट कृत्य
 • वामकर्मी अभिचार विशिष्ट कृत्य
 • पित्तर, आप्त वा इतर संबंधित यास गति नसणे
 • प्रेत लोकांतील पैशाचिकादिकाची पीडा असणे
 • नागवध करणे

ह्या सहा कारणांनी विशेष करून अनपत्यादि दु:खे प्राप्म होतात असे त्यांस आढळून आले. आता वरील कारणांचा खुलासेवार विचार करू. पित्तरास गति नसणे म्हणजे सृष्टीक्रमाप्रमाणे त्यास पितृलोक न मिळणे म्हणजे तृप्ति नसणे यामध्ये पुष्कळ गोष्टी अंतर्भूत आहेत. शास्त्रकारांनी असे ठरविले आहे की, ज्ञानराज्याचे संचालक ऋषी आहेत व अधिभूत अधिभौतिक स्थल राज्याचे संचालक देवतागण आहेत व अधिभूत अधिभौतिक स्थल राज्याचे संचालक नित्य पित्तर आहेत.

अर्थात पितरांचे तृप्तीने ऐहीक सुखाचा लाभ होतो. त्यांची तृप्ती म्हणजे त्यांना उद्देशुन श्राध्द करणे. आता श्राध्द म्हणजे काय याचाही विचार क्रम प्राप्तच आहे. श्राध्द या शब्दात श्रध्दा हा मुख्य शब्द आहे. आपला जन्म ज्या कुलात झालेला असतो त्या कुलातील तसेच मातामहादि कुलातील मृत पुर्वजांच्या (प्रेत व पित्तर) तृप्ती करिता तसेच त्यांच्या तृप्तीने लाभणारी सत् संतती व चिरसंपत्ती याकरिता तिलदंभदिकांनी सविधी दिलेल्या अन्नोदकरुप पितृयज्ञाला श्राध्द असे म्हणतात. श्राध्द शिवाय़ कितीही पवित्र व कितीही मृल्यवान पदार्थ पित्तर ग्रहण करू शकत नाहीत श्रध्दापूर्वक असूनही विना मंत्राने दिलेले अन्नोदक पित्तरांना मिळत नाही असे स्कंद पुराण माहेश्वर खंड, कुमारीकाखंड अध्याय ३५/३६ यामध्ये सांगितलेले आहेत. हे पित्तर कमोधिन नाहीत या नित्य पित्तरांचे २१ गण आहेत ते श्राध्द भाग पोहोचविण्याचे काम करतात. श्राध्दादि पितृकार्य करणारा निरोगी, दिर्घायु, सुपुत्रवान, श्रीमान धनोपार्जक असा होतो व परलोकी त्यांस तृप्ती मिळते. म्हणूनच साधन सोडून साध्याची प्राप्ती कशी होणार?

आयु प्रजा धनं विद्या मोक्ष सुखानिच !
प्रयच्छन्ति यथाराज्य नृणां प्रीता: पितामहा: !

अर्थात ऐहिक व पारलौकीक सुख देण्यास पित्तर कारणीभूत आहेत ही गोष्ट लक्षात येईलच. आता आणखी एक गोष्ट विचारणीय आहे ती म्हणजे आपणांस आपले पित्तरांपैकी कोणास योग्य गति मिळाली व कोणास कोणत्या कारणाने मिळाली नाही अशा पितरांकरिता काय केले असता आपण त्या ऋणांतून मुक्त होऊ याचा विचार आमचे ऋषींनी केला आहे. या कालात पितृकर्माचा पूर्णपणे लोप झाला आहे. त्यामुळे सुखांचाही नाश होत आहे. गृहस्थाश्रम म्हणजे पितरांची आराधना होय. गृहस्थाश्रमाच्या पूर्णतेस या पितरांची अनुग्रह अत्यावश्यक आहे.

एकंस्य पुत्रनाश:स्यात् एकौदुहितरं लभेत ।
विरोधी बन्धुभि: साधे प्रेत दोषास्ति मे खग ।।
संततिदृश्यते नैव समुत्पन्ना विनश्यति ।
प्रकृतेस्तु विपर्यासो विद् विषो सहबंन्धुभि: ।।
पशुद्रव्य विनाश: स्थात् सा पिडा प्रेत संभवा ।।
देश कालेच पात्रेच श्रध्दय विधिनाच यत् ।।
पितृनुद्दिश्य विप्रेभ्यो दानं श्राध्द उदा-हतम् ।।

पितृ शापाने संततिविच्छेद होतो. योग्य बांधवांशीही वैर उत्पन्न होते. पशु, द्रव्य यांचा विनाश होतो. मनुष्य व्यसनसधीन होतो अशी दु:खे निर्माण होतात. कुटुंबातील लोक धर्मभ्रष्ट प नितीभ्रष्ट होतात. थोडक्यात म्हणजे घराची काळच नष्ट होते म्हणून या दु:खाच्या नाशा करिता शास्त्रकारांनी उपाय योजना केली आहे की पितरांचे उद्देशाने पवित्र स्थळी, योग्य काळी सत्पात्र पाहून विधीयुक्त प्रारे जे अन्न, आहार, द्रव्यादि अति श्रध्देने दिले असते त्याला श्राध्द असे म्हणतात. तोच हा नारायणबली विधी होय. पित्रार्जित संपत्तीकरीता व कर्तव्य म्हणून त्यांचे वृध्दापकाळी त्यांची सेवा करणे हे जसे कर्तव्य आहे. तसेच मरणोत्तरही त्यांचा अर्यमादि पितृदेवांकरीता आणि जगतपालनकर्त्या विष्णू प्रित्यर्थ तसेच सत्संतती व चिर संपत्ती त्यांच्या लाभाने पूर्ण होणार्‍या गृहस्थ धर्माकरिता हे अनुष्ठान प्रथम वेदानेच निर्मित केले आहे. आपले वंशातील सर्व मृतांत्म्यांना प्रेत लोकांतून पितृलोक मिळावा हाच हा विधी करण्याचा उद्देश आहे. शास्त्रा सांगितलेला जो एकंदर श्राध्द विचार आहे त्यातील हाच भाग प्रामुख्याने आहे.

पुनाम नरकात त्रायते इति पुत्र: ।।

अर्थात पारलौकिक सुख देण्यासहि पुत्र हाच कारणीभूत आहे, म्हणजे त्याचे ते कर्तव्यच आहे, म्हणून पुत्र शब्दांची व्याख्या केली आहे. परंतु विस्तार भयास्तव नको. तरी या विधिच्या कारणांचा उद्देश वरील विवेचना वरून लक्षात येईल.

दुसर्‍यांचे धन लुबाडणे होय किंवा वारसा हक्काने धन मिळणे, दुसर्‍याचे धन घेतले म्हणजे सर्व झाले असे नव्हे. जसे दुसर्‍यांचे धन घेतले आहे ती व्यक्ती जर हयात नसेल तसेच ती व्यक्ती निपुत्रीक असेल तर त्या व्यक्तीचे श्राध्द करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्या व्यक्तीचा श्राध्द लोप होत असेल तर वरील कारणांपैकी दिलेल्या पीडा ही उत्पन्न होऊ शकतात.

पिशांच्यांच्या त्रासातून मुक्ती

एखाद्याची स्थावर किंवा जंगम इस्टेट, शेत जमीन, धन आदी चुकीच्या मार्गाने किंवा फसवून आत्मसात केलेली असेल ती असा दुखावलेला मृतात्मा त्याच्या मृत्युनंतरही त्या भौतिक संपत्तीमध्ये राहतो आणि दोषी व्यक्तीला अमर्यादित कालखंडापर्यंत त्रास देत राहतो. जरी दुखावलेल्या मनुष्याचे शरीर अग्नीत भस्मसात झालेले असले तरी सुध्दा अशा व्यक्तींचा आत्मा व्यवस्थितपणे पुढच्या प्रवासाला असंतोषामुळे वा अतृप्ततेमुळे जावू शकत नाही म्हणजेच अशा अतृप्त आत्म्याचा मुक्तीचा मार्ग खुंटतो आणि त्या व्यक्तीचे भूत वा पिशाच्च सूड घेण्याच्या दृष्टीने त्याला अतृप्त ठेवणार्‍या व्यक्तीच्या मागे त्रास देण्यास उद्युक्त होते अशा व्यक्तीची अंत्येष्टि जर व्यवस्थित केली नसेल किंवा श्राध्दाचा विधिवत विधि केलेला नसेल तर अनेक संकटांनी ह्या अतृप्त आत्म्यामुळे त्याला जबाबदार असलेल्या व्यक्तींना सामोरे जावे लागते आणि शेवटी असे अतृप्त आत्मे भूत-पिशाच होतात.

खालील काही अतृप्त आत्म्यांनी दिलेल्या त्रासांची यादी दिली आहे

 • कुंटुबात फक्त मुलीच जन्माला येणे, मुलगा न जन्मणे, जन्माला आलाच तर तो अल्पायुषी होणे.
 • व्यापारात किंवा धंदयात अपयश आणि सतत डोक्यावर वाढत्या कर्जाचे ओझे असणे.
 • शेतीमध्ये अपयश, शेतीची जनावरणे अकस्मात कारण न समजता मृत्युमुखी पडणे.
 • कुंटुबात कोणीतरी सतत आजारी असणे.
 • कुंटुबात सतत आपआपसात भांडणे होणे.
 • महिला सदस्याची अनियमित पाळी येधे, धुपावणे इत्यादी.
 • शारिरीक त्रासांचे वा रोगांचे डॉक्टरांकडून निदान न होणे
 • दोन्ही जेवणाच्या वेळी नेहेमीच भांडणे सुरू असणे.
 • कुंटुबातल्या पुरुषाने त्याच्या पत्नीला कारणाशिवाय सोडून जाणे
 • घरातील एखादा सदस्य घरातून निघून जाणे वा पळून जाणे
 • भरपूर प्रयत्नांनी ही पैशांची चणचण भासणे (जाणवणे)
 • घरात अन्न, डाळीचा तुटवडा भासणे (जाणवणे)
 • कुंटुबातील एखादया सदस्यावर भूत पिशाच्याचा प्रभाव जाणविणे.
 • एखादया वेडया वा विकृती असलेल्या बालकाचा जन्म होणे.

वरील त्रासांमधील कोणत्याही त्रासातून मुक्तता करून घेण्यासाठी नारायणबळी-नागबळी विधीचा विधिवत धार्मिक विधी करण्याचा सल्ला दिला जातो.

पिशाच्च बाधा विवरण

या जन्मी अगर मागील जन्मी एखाद्याने द्रव्य, शेती वैगरे ऐहिक सुखसाधने यांचा अपहार करणे, आता अपहरण ज्याचे होते तो जीवात्मा त्या त्या प्रियतम वस्तुमध्ये तन्मय झालेला असतो. ताे जिवीत असतांना झालेले संस्कार, असलेले निश्चय, विशिष्ट देहाचे ठिकाणी असणारा 'मी' पणाचा अभिमान मृत्युनंतरही असतो. जीव हा त्यांचे भावनेप्रमाणे शरीर धारण करतो व वासनेप्रमाणे शरीरास वागवतो व सर्व क्रिया करतो. देह वासनामय असतो. वासना मनोमन असते व मन वासनामय असते. सुक्ष्म देह नष्ट झाल्यावर प्राप्त होणारा अतिवाहक सुक्ष्म देह पंचतन्मात्रा सुक्ष्म पाच ज्ञानेंद्रिये (मन, बुध्दी, चित्त, अंहकार व जीव अंत:करण चतुष्टय या मिळून होतो)

तो केवळ मनोमय असतो. या विवेचना वरून ''अन्ते मति:सा मति'' या नियमाप्रमाणे त्या जिवात्मास गति मिळत नाही. तो जिवात्मा असल्यामुळे त्याचे वासनेप्रमाणे वासनेशी संबंधित असलेल्या लोकांना तो पिडा देतो. त्याप्रमाणे सृष्टी क्रमानुसार त्यास गति मिळत नाही, तो पैशाचिक योनित जातो. अशा रितीने पैश्याच्चादिक बाधा येते. या जन्मी अगर मागील जन्मी आपण केलेल्या कर्माचा तो परिपाक असतो. तो दूर होण्याकरिता शास्त्रकारांनी असे सांगितले आहे की सर्व व्याधि व पिडा आपल्या कर्मानेच निर्माण होतात. त्याचे कारण परंपराही माहित नसते, म्हणूनच या विधीद्वारे, औषधांच्या उपयोगांनी, तसेच ब्राम्हणांनी दिलेल्या दानाने, जेवू घातलेल्या अन्नाने ब्राम्हणांकडून योग्य स्थळी केलेल्या अनुष्ठानाने आपली गृहपिडा, भूतबाधा, रोगबाधा नष्ट होतात हा अनुभव आहे. तेथे सुक्ष्म देहाचे प्राधान्य गृहीत धरले जाते. पुर्वजन्म कर्मानेच अगर ह्या जन्मीच्या अत्युत्कट पापाने दु:खाची प्राप्ती होते. पूर्व कर्म सुक्ष्म देहरूपाने येथे देत असते. म्हणून संकल्पाने दिलेले अन्न आहारादि संकल्परूप वासनामय सुक्ष्म देहावर परिणाम करू शकते. याप्रमाणे असलेली पैश्याच्चिक बाधा दूर होऊन संतती प्रतिबंध वगैरे दु:खे नाहीशी होतात.

चुकीच्या कारणांनी अवेळी आलेला मृत्यु

चुकीच्या कारणांनी अवेळी आलेल्या मृत्युस 'दुर्मरण' असे आपल्या धर्मात म्हटले आहे. ज्या व्यक्ती अशा कारणांनी निधन पावतात त्या त्यांच्या संबंध कुंटुबाला त्रासदायक ठरतात. त्यांच्या कुंटुबाला फार त्रास आणि हाल सोसावे लागतात. अवेळी आणि समर्थन करू शकणारे मृत्यु खालील दिलेल्याप्रमाणे आहेत.

 • विवाहपुर्वी मृत्यु
 • पाण्यात बुडून मृत्यु
 • धोकादायक प्राण्याच्या अकस्मात हल्ल्याने आलेला मृत्यु
 • कुणीतरी केलेला लहान मुलाचा खुन
 • अग्नीत जळून झालेला मृत्यु
 • आत्महत्या
 • विजेच्या शॉकमुळे झालेला मृत्यु
 • खाताना घशात अन्न अडकून झालेला मृत्यु
 • अति भोजन वा अति मदिरा सेवनाने झालेला मृत्यु
 • परदेशात झालेला मृत्यु
 • पंचका त्रिपाद वा दक्षिणायनात झालेला मृत्यु
 • वरील कारणांपैकी एका कारणामुळे झालेला मृत्यु, जर त्याचे आपले कोणीही पिंड देण्यासाठी नसेल तर.

शाप दर्शविणारी (शाप संकेत देणारी) स्वप्ने

जर एखाद्या स्त्री वा पुरूषाने खाली दिलेली दृश्ये त्यांच्या स्वप्नात पाहिली तर कुणाचा तरी पूर्वजन्मीचा शाप असावा असे समजावे. खाली काही उदाहरणे शाप संकेत स्वप्नांची दिली आहेत.

 • स्वप्नात नाग पहाणे किंवा नाग मारतांना पहाणे किंवा मेलेल्या नागाचे तुकडे पहाणे
 • टाकी, नदी अथवा समुद्राचे पाणी पहाणे
 • स्वत:ला पाण्यात बुडतांना पहाणे किंवा पाण्याच्या बाहेर येतांना पहाणे
 • स्वप्नात भांडण पहाणे
 • स्वप्नात इमारत कोसळतांना बघणे
 • अशी स्त्री पहाणे जिची मुले दिर्घकाळ जगत नाहीत, अशी स्त्री पहाणे जी मृत बालक घेऊन जात आहे आणि तिला वाटते आहे की तिचे ते मुल जिवंत आहे. तिचे मुल तिच्याकडून कोणीतरी बळजबरीने ओढुन झोत आहे इत्यादी.

नारायण नागबळी कसा करायचा ह्याची पध्दत प्रसिध्द धार्मिक पुस्तक 'धर्मसिंधु' किंवा 'धर्मनिर्णय' ह्यात सविस्तर वर्णन केलेली आहे.

मनुष्याचे सर्प जातीशी विशेषत: नागजातीशी संबंध

मनुष्याचे सर्पाशी (नागांशी) नाते
भगवान श्रीकृष्णांनी भगवदगीतेत स्पष्ट सांगितले आहे की प्रत्येकाला त्याच्या हलक्या प्रतिच्या, नीच अभिलाषेप्रमाणे इच्छेप्रमाणे, वासनेप्रमाणे जन्म मिळतो. नीच अभिलाषेचे रुपांतर मनाच्या अति दोषांमध्ये होते. वासनेची हाव, आणि राग, जेवढा वासनेचा विचार अधिक तेवढीच संभोगाची तीव्र इच्छा आणि ही इच्छा पूर्ण झाली नाही किंवा त्यात अडचण अथवा अडथळा आला की त्याचे रागात रुपांतर. राग हा मनुष्याच्या विचार शक्तीचा र्‍हास - नाश करतो. अति वासनेच्या लोभाने मनुष्य जेव्हा त्याची माणुसकी हरवुन बसतो तेव्हा त्याचा जन्म सर्पयोनीत होतो. ह्याचाच अर्थ असा की मृत्युनंतर अशा मनुष्याच्या आत्म्याला सर्पाचा जन्म मिळतो. सर्प जातीचे आणि मनुष्याचे पुरातन काळापासून संबंध आहेत.

महाभारतात हे संबंध अधिक स्पष्ट आहेत. ब्रम्हाने सात ऋषी निर्माण केले होते. त्यापैकी एक कश्यप हे ऋषी मारिचे पुत्र होते. ऋषी कश्यपाच्या दोन पत्नी होत्या. एकीचे नाव कटटू होते आणि दुसरीचे विनिता. कटटूची सर्व अपत्ये साप रुपात होती आणि विनिताची मुले गरुड रुपात होती ह्याप्रमाणे साप आणि मनुष्यांचे संबंध दृष्टीपथात आले.

सत्ताविस नक्षत्रांमध्ये रोहिणी आणि मृगशीर्षचे वंश सुध्दा सर्पजातीचे मानले जातात म्हणून मनुष्य प्राणी आणि सर्पजातीचे संबंध सारखे वाटतात. योगशास्त्राप्रमाणे शरीर आणि मन कुंडलिनीच्या शक्तीच्या जागृतीने भारले जाते. कुंडलिनी ही मनुष्य शरीरातच स्थित आहे. प्रसिध्द आदरणीय संत ज्ञानेश्वरांनी कुंडलिनीची संकल्पना त्यांच्या ज्ञानेश्वरीत अत्यंत सुंदर पध्दतीने विशद केलेली आहे. कुंडलिनी ही एक सर्पाकार नाडी आहे. तिची शक्ती पाठीच्या कण्याच्या सुरुवातीला असते. जर ह्या शक्तीला व्यवस्थितपणे जागृत केले तर मनुष्याला संपूर्ण विश्वाचे ज्ञान आत्मसात होते. ह्या ज्ञानाला आपल्या भाषेत ब्रम्हज्ञान म्हणतात.

कुंडलिनीच्या जागृतीमुळे मनुष्याचे जीवन आणि त्याच्या आत्म्याचा संबंध येतो. मनुष्य शास्त्रीय दृष्टया त्याच्या ज्ञानात सर्वस्वी परिपूर्ण कुंडलिनीच्या फक्त मदतीमुळे होतो.कुंडलिनी आणि सापाची परिस्थिती सारखीच आहे म्हणून आपल्या पुर्वजांनी सापाला अधिक महत्व दिलेले आहे. आणि त्यासंबंधीत रुढी रिवाजांनाही. आपण सापाला मारले व दुसर्‍याला मारण्यास सांगितले तर सापाच्या मृत्युचे पापाचे ओझे आपल्यालाच वहावे लागते. हे पाप वंश विकासाची प्रगती रोखते वा त्यात अडथळा निर्माण करते. कुंटुबातील पुरूष मुलांच्या संदर्भात साप मारण्याचे दुष्परिणाम फार प्रकर्षाने पहावयास मिळतात. ह्या पापातून सुटका करून घेण्यासाठी अथवा मुक्तता करून घेण्यासाठी नागबळीचा विधी विधिवत करण्याची मान्यता आहे.

जमिनीत कोठेही धन परलेले असो त्या ठिकाणी बर्‍याच लोकांनी साप पाहिला असेल आणि ते साहजिकच आहे. ज्या मनुष्य प्राण्याने ते धन जमिनीत पुरले-गाडले असेल त्याचा संबंध त्याच्या मनाशी आहे म्हणून त्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्यासंबंधी व्यक्तीचा आत्मा पुरलेल्या धनाच्या अवती-भोवती घुटमळतो आणि साप योनीत रुपांतरीत होतो.

careful
apps-banner
यजमान आणि यात्रेकरुकरीता महत्त्वाची माहिती   
© Copyright 2015 All rights reserved at Shikhare B. S.