त्रिपिंडी श्राध्द

त्रिपिंडी श्राध्द म्हणजेच काम्य श्राध्द. ज्या मृत व्यक्तींचे सतत तीन वर्ष विधिपूर्वक श्राध्द केले जात नाही अशा व्यक्तींच्या आत्म्याचे रुपांतर प्रेत योनित होते. अमावास्या पित्तरांचा दिवस असतो. ह्या दिवशी श्राध्द केली जातात. परंतु नवरात्र आणि भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात मृत्युदिवशी त्रिपिंडी श्राध्द करीत नाही.

त्रिपिंडी श्राध्द कोठे आणि कधी कराल? त्रिपिंडी नैतिक आणि कायदेशीर अधिकार
त्रिपिंडी महत्व आणि श्राध्द त्रिपिंडी फलित वा परिणाम

त्रिपिंडी श्राध्द कोठे आणि कधी करावे ?

tripindi-shraddha

श्रावण, कार्तिक, पौष, माघ, फाल्गुन, आणि वैशाख महिन्यांच्या शुक्ल आणि वद्य पक्षांच्या पंचमीस, अष्टमीस, एकादशी, चर्तुदशी, आणि अमावास्या ह्या दिवशी पारंपारिक शास्त्र शुध्द पध्दतीने त्रिपिंडी श्राध्द करता येते. सामान्यता सूर्य कन्या किंवा तुळ राशीत १६ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत असतो ह्या कालखंडात पित्तरांना पृथ्वीवर मुक्तपणे भ्रमण करण्याची परवानगी असते असा समज आहे म्हणून वर उल्लेखिलेला कालखंड त्रिपिंडी विधिसाठी अधिक फायदेशीर असतो. जर समस्या अधिक बिकट आणि तीव्र असतील तर 'गोदाविवेक दर्श' ह्या पुस्तकाचा संदर्भ घेण्यास काहीच अडचण नाही. हे पुस्तक मार्गदर्शनासाठी सुरेख आहे. त्रिपिंडी श्राध्द फक्त त्रिंबकेश्वरीच करावे.

त्रिपिंडी श्राध्द वर्षातून केव्हाही त्रिबंकेश्वरीच शास्त्रशुध्द विधिने करता येते. ह्या वचनाला आपल्या पारंपारिक शास्त्राचा पांठिबा आहे. कवि कवीदासांनी रचलेल्या महान आणि श्रेष्ठ काव्यात म्हणजेच रघुवंशात त्रिंबकेश्वरचा उल्लेख महेश्वर असा केला आहे. ह्या काव्यात महेश्वराला प्रार्थना केली आहे की त्याने प्रेतयोगी अस्तित्वात असणार्‍या आत्म्यांच्या कुकर्मांना नष्ट करून त्यांना मुक्ती द्यावी.

त्र्यंबंकेश्वर तीर्थ क्षेत्रामध्ये कुशावर्त नावाचे एक तीर्थ म्हणजे सरोवर आहे. ह्या सरोवराजवळ एक मोठे अश्वत्याचे म्हणजे पिंपळाचे झाड. ह्या झाडाजवळ 'करपदीकेश्वराचे' एक मंदीर आहे. त्रिपिंडी श्राध्द ह्या मंदिराजवळ केल्यास फार लाभदायक होते असे म्हणतात.

त्र्यंबकेश्वरपासून सहा किलोमिटर अंतरावर एक स्थान आहे त्या स्थानास पिशाच्च विमोचन तीर्थ म्हणून ओळखले जाते. जर ह्या ठिकाणी त्रिपिंडी श्राध्दाचा विधीपूर्वक विधी केला तर पिशांच्चांचा त्रास नाहीसा होतो अशी मान्यता आहे. ह्याचा अनुभव अनेकांना आलेला आहे.

जर तिर्थ श्राध्द आणि त्रिपिंडी श्राध्द शास्त्रशुध्द पध्दतीने करायचे असेल तर प्रथम त्रिपिंडी श्राध्दाचा विधी करावयाचा असतो आणि नंतर तिर्थ श्राध्दाचा विधी करावयाचा असतो. प्रेत योनी तीन प्रकारच्या असतात. त्यांची नावे तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी अशी आहेत.

मनुष्याच्या स्वभावानुसार गुणानुसार त्यांचे रुपांतर त्याच्या मृत्युनंतर त्या योनीमध्ये होते. त्रिपिंडी मृत्युनंतर प्रेत योनीत पिशाच्चापासून सुटका करून घेण्यासाठी केले जाते. त्रिपिंडी श्राध्दाचा विधीवत विधी करण्यापूर्वी शरीर शुध्दतेसाठी गंगामिलन-गंगास्नान करावे लागते ह्या श्राध्दासाठी क्षौर म्हणजे मुंडण करण्याची 'डोक्यावरचे केस काढण्याची' आवश्यकता नसते परंतु पायसिंध्दत्ताचा विधी संपन्न करतांना सामान्यत: क्षौर केले जाते अशी प्रथाच रुढ झालेली आहे. त्रिपिंडी श्राध्द करतांना ब्रम्हा, विष्णु, आणि महेश ह्या देवतांच्या प्रतिमा करून त्यांची मनोभावे पुजा करण्याची पध्दत आपल्या पारंपारिक शास्त्रात आहे. तीन ब्राम्हणांना मंत्रोंचारणाचा आणि ह्या तीन देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अधिकार दिलेला आहे. जर त्रास देणार्‍या प्रेतयोनीचे नाव आपल्याला माहित नसेल तर 'अलारिष्टा गोत्रा' ह्या शब्दाचा उपयोग करतात. हे श्राध्द एका विशिष्ट प्रेतयोनीला या आत्म्याला संबोधूनच केले जाते. ह्या विधीत तीन वेगळे जवसाच्या पिठाचे, तिळाचे आणि भाताचे (तांदूळ शिजवून) पिंड करतात. हे पिंड करतांना त्यात साखर आणि तुपही घालतात. जवसाच्या पिठाचा पिंड तमोगुणी मृतात्म्याला अर्पण करतात. पुजा झाल्यानंतर हे सर्व पिंड, महालिंगाचा नैवेद्य इत्यादी देवासमोर ठेवतात ही कृती आपल्या कुटूंबाला त्रास देणार्‍या पिशाच्यांना खुश ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या कुकर्माचा त्रास आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला होवू नये म्हणून आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे ह्या प्रेतात्म्याला चिंरशांती मिळाल्याच्या हेतुनेच केली जाते. सोने, चांदी, तांबे, तांदूळ, जवस, काळे तीळ, उडिद, खडावा-पादुका किंवा गायीचे दान करतात किंवा त्यांच्या किंमतीएवढे धन दान करतात. त्यानंतर ब्राम्हण भोजनात विवाहित स्त्रियांनाही बोलावले जाते अशा पध्दतीने त्रिपिंडी श्राध्दाचा विधी फक्त त्र्यंबकेश्वरमध्ये वर्षाच्या कोणत्याही दिवशी करता येतो असे आपल्या धर्माशास्त्राचे म्हणणे आहे.

त्रिपिंडी नैतिक आणि कायदेशीर अधिकार

  • पति आणि पत्नि दोघांना एकत्र हा विधी करण्याचा अधिकार आहे.
  • विधुर पुरुष (ज्याची पत्नि हयात नाही) सुध्दा हा विधी करू शकतो.
  • अविवाहित पुरुष सुध्दा हा विधी करू शकतो.
  • हिंन्दू स्त्री विवाहानंतर दुसर्‍या कुटुंबात जाते तिला तिच्या माता-पित्यासाठी त्रिपिंडी श्राध्द करण्याचा अधिकार नाही. परंन्तु तिच्या पतिच्या नात्यातील मयतांसाठी त्रिपिंडी श्राध्दाचा अधिकार तिला आहे. ह्या विधीसाठी तिला पांढरे वस्त्र नेसावे लागते.

त्रिपिंडी महत्त्व आणि श्रध्दा

त्रिपिंडी विधी म्हणजे सत्यनारायण कथा नव्हे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावयास हवे, म्हणून हा विधी कुशल मार्गदर्शकांच्या मदतीने संपूर्ण विश्वास आणि श्रध्देने पारंपारिक शास्त्रशुध्द पध्दतीनेच करावा. ह्या संदर्भात आपल्या धार्मिक ग्रंथात एक प्रसिध्द कथा आहे. भीष्माचार्य आपले पिताश्री शंतनूचे श्राध्द करीत होते. पिंडदान करण्यासाठी चटई जमिनीवर अंथरलेली होती. त्याचवेळी एक सोन्याचे आभूषण घातलेला हात पिंड घेण्यासाठी जमिनीतून वर आला. तो हात पाहून भीष्माचार्य सुध्दा क्षणभर गोंधळले की पिंड कोठे ठेवावा आणि मग त्यांना आठवले की पारंपारिक शास्त्रानुसार पिंड दर्भावरच ठेवावयाचा असतो आणि त्याप्रमाणे त्यांनी पिंड दान दर्भावर केले आणि तात्काळ शंतनुराजाचा हात लुप्त झाला. भीष्माचार्यांनी वडिलांचे बोलणे ऐकले ते म्हणाले भीष्माचार्या मी तुझ्या ज्ञानाची परीक्षा (पारंपारिक शास्त्रज्ञानाची ) परीक्षा बघत होतो तू खरोखरीच योग्य ठिकाणी म्हणजे दर्भावर पिंड दान केलेस कारण तुझी पारंपारिक शास्त्रज्ञानावर श्रध्दा होती आणि माझ्या हातात पिंड ठेवले नाहीस म्हणून मी तुझ्या शास्त्रशुध्द ज्ञानावर आणि श्रध्देवर खुश आहे.

थोडक्यात सांगायचे म्हणजे हा धार्मिक विधी करतांना श्रध्देने, विश्वासाने आणि पारंपारिक शास्त्रानुसारच करा. त्रिपिंडी श्राध्दाचा प्रयोग स्वत: मन मानेल तसा करू नये.

त्रिपिंडी फलित वा परिणाम

काही लोक, जिवंत असतांना आपल्या नातेवाईकांना किंवा माता-पित्यांना खूप त्रास देतात आणि त्यांच्या मृत्युनंतर मात्र औपचारिकतेचे प्रदर्शन करण्यासाठी 'गंगा प्रसादी' चा विधी खूप मोठया प्रमाणात करतात. 'गंगा प्रसादी' म्हणजे मयताचे सर्व क्रिया कर्म गंगा नदीवर करून गंगेचे पाणी आपल्या घरी आणून मयत इसमास मान देण्यासाठी राजभोजनाचा मोठा कार्यक्रम करायचा म्हणजेच खुप लोकांना जेवण द्यायचे. असे समारंभ आपण आपल्या अवती- भौवती नेहमीच पाहतो. एवढे केल्यानंतर ही अतृप्त आत्म्यामुळे अशा लोकांना त्रास सोसावा लागतो, जर पारंपारिक पध्दतीने शास्त्रशुध्द विधिवत श्राध्द झाले नाही तर भूतांचा/प्रेतांचा त्रास सहन करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नसते. वैद्यकीय शास्त्रानुसार या त्रासावर इलाज करू शकत नाही म्हणजेच वैद्यकीय औषधे वा सल्ला निरुपयोगी ठरतो.

घरात नेहमीच भांडणांचे वातावरण असणे, वयात आलेल्या मुला-मुलींचे सर्व संपन्नता असूनही विवाह न होणे, व्यापारात कर्जबाजारी होणे, मयत व्यक्ति नेहमीच स्वप्नात येणे, चेटूक जादु केल्यामुळे असह्य वेदना वा यातना होणे. अशा त्रासांपासून सुटका करून घेण्याची शक्तिसुध्दा आहे. आमच्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्यांनी त्रिपिंडी श्राध्द विधी विधिवत केला आणि त्यांचे प्रश्न चुटकी सारखी सोडवले गेले वा त्यांची त्यांना होणार्‍या त्रासातून मुक्तता झाली.

जर नारायण बलीचा विधी 'पुतळा विधी'सह केला तर त्रिपिंडी विधी वेगळा व पुन: करण्याची गरज नाही. संन्याशी लोकांना श्राध्दाचा विधी करणे अत्यावश्यक नसते कारण त्यांना देवा समान मान दिला जातो. परंतु संसारी माणसाला ज्याला कुटुंब, मुले, बाळे आहेत त्यांच्या हयात नसलेल्या माता-पित्यांसाठी अथवा पूर्वसूरींसाठी हा विधी आवश्यक मानला जातो.

careful
apps-banner
यजमान आणि यात्रेकरुकरीता महत्त्वाची माहिती   
© Copyright 2015 All rights reserved at Shikhare B. S.