ज्योतिष शास्त्रा संबंधी समज - गैरसमज वैचारिक लेख

आज काल वरील दोन्ही विषयाबाबतीत योग्य - समजापेक्षा गैरसमज जास्त फोफावला व बोकाळलेला आहे. ह्याला कोण जबाबदार असेल तर त्या म्हणजे व्यक्ति आहेत. स्वत: जातकच. (पत्रिका दाखविणारा) ह्याचे मुळ कारण आहे स्वत:चा स्वत:वरचा आत्मविश्वास कमी असणे. असा विषय घेण्याचे कारण म्हणजे आज प्रत्येकाला मी सर्वांच्या पुढे गेले पाहिजे हाच अटट्हास असतो. त्या पायी तो आपल्या क्षमतेपेक्षा इतका धावतो की, त्यांची दमछाक होते हे त्यास कळत नाही. पण हीच खरी गोष्ट त्यास कळत नाही. दमछाक होण्याचे खरे कारण्‍ा आहे, ज्योतिष शास्त्रा बाबतचे अर्धवट ज्ञान. अशा अर्धवट ज्ञान असणार्‍या जातकासाठी काही महत्वाच्या माहिती वजा सूचना.

१) खरे तर ज्योतिष म्हणजे काय? ज्योतिष कशाशी खातात व पितात सामान्य जनतेस हेच माहिती नाही. म्हणून पहिले त्याचा अर्थ समजुन घेणे अत्यावश्यक आहे. ज्योति व ईष ह्या दोन शब्दांपासून ज्योतिष हे वाक्य निर्माण झाले आहे. ज्योती म्हणजे प्रकाश व ईष म्हणजे ईश्वरी संकेत. ज्योतिष म्हणजे हे एखाद्या अडचणीचे निदान करणारी पध्दत आहे (उदा- सोनोग्राफी वा एक्स रे वा सिटी स्कॅन हे जे काही आहे ते जसेच्या तसेच दाखविते तसेच ज्योतिष शास्त्र ही ज्या अडचणी आहेत तेच दाखविते पण त्यात काही बदल करीत नाही, कारण ज्योतिष शास्त्रही जातकाच्या आयुष्यात काही बदल करीत नाहीत)

२) जसे डॉक्टर काही अडचण असल्यास जसे काही उपाय सुचवितो तसेच ज्योतिषी सुध्दा तसेच उपाय सुचवित असतो. ज्योतिष्यात सुध्दा तीन (३) तर्‍हेचे उपचार आहेत.

  • दैवी आराधना वा उपासना, धार्मिक विधी वगैरे,
  • जप व तप क) रत्न-खडे व मंत्र (रत्न-खडे व यंत्र ह्याचा असर खुपच हळु प्रमाणात होत असतो. टिव्हीवरुन वा वर्तमानपत्राद्वारे ह्यातूनच खरी फसवणूक हल्ली जास्त प्रमाणात होत असते. हीच फसवणूक सामान्य माणसांच्या लक्षातच येत नाही. )
३) ह्या जगात दोनच जण भाग्य बदलू शकतात ते आहेत देव व सच्चा गुरू. आज काल टिव्हीवर वा वर्तमानपत्रात १००% भाग्य बदलून देण्याचे जे काही दावे केले जातात. ते दावे जवळ-जवळ खोटे आहेत, अशा व्यक्ति दोन-दोन दिवस ह्या शहरात तर उद्या दोन-दोन दिवस त्या शहरात असे गावो गावभटकत रहातात. ज्यांचा नीट ठाव ठिकाणा नीट माहित नाही. त्यांना योग्य ज्योतिषाचे सखोल ज्ञान आहे की नाही, ह्याची पुसटशीही कल्पना न घेता त्यांचे वर किती भरवसा ठेवावा ह्याचा ही विचार व्हावा. ज्यांचे दुकान एका ठिकाणी धड नीट चालत नाही तेच लोक गावो-गाव भटकत लोकांना फसवत असतात. कधी एखाद्याने अशा लोकांना प्रश्न करावा की, आपल्या भाग्यात दारोदार भटकण्याचा का बरे योग आहे? कारण फसवणुक झाल्यानंतर ओरडण्यात काहीच अर्थ नाही. पाणी वा सोने हे आपल्या जवळ कधीही येत नाही. उलट पक्षी आपणांस त्यांच्या जवळ जावे लागते.

४) नियम हा आहे की बाजारात काही खरेदी करतांना आपण आपल्या बुध्दीचा वापर करून काही खरेदी करत असतो, ज्यामुळे आपली कोणी फसवणूक करू नये हीच त्यामागची आपली भूमिका, पण धार्मिक वा ज्योतिषाच्या बाबतीत आपण बुध्दीचा वापर न करता ती कोठे तरी गहाण टाकुनच आपण त्याची पायरी चढत असतो असा आमचा जवळ-जवळ अनुभवच आहे.

५) तसेच प्रत्येक ब्राम्हणांस वा प्रत्येक ज्योतिष पहाणार्‍यास ज्योतिष समजते हा ही एक गैर-समजच आहे. उदा- जर आपणांस आयुष्यात १०० जण पत्रिका पाहाणारे भेटले तर त्यात ६० जणांना जुजबी माहिती असते. ३० जणांना ठीक माहिती असते. तर ११ जणांस चांगलीच माहिती असते. (आमच्या मते ६० म्हणजे कंपाउंडर, ३० जण एम.बी.बी.एस आणि १० म्हणजे एम.डी किंवा एम.एस) पितळ व सोने जरी रंगाने पिवळे दिसत असले तरी फक्त पारखीच फक्त पितळ व सोने ह्यातील फरक नीट समजु शकतो ह्यात काही शंकाच नाही.

६) ज्यांना आम्ही कंपाउंडर असे संबोधतो तेच लोक फक्त साडेसाती, लग्न जमवितांना पत्रिकेतील मंगळ, नाडी, गुण, वर्ग ४,८,१२ ह्या गुरूबलाचा आदी खुळचट न चालणार्‍या नियमांचा वापर करून सामान्य जनतेची फसवणुक करीत असतांना सामान्य जनता फसवणुक होऊनही शांत मुकाट कशी बसते हेच आमच्यासारख्याच्या समोर प्रश्न आहे. कारण नियम असा आहे की, डॉक्टरचे चुकीचे उपचार हे पहिल्यांदा रोग्याचाच जीव घेत असतो. हाही ह्या जगाचा पहिला नियम किंवा अनुभवही आहे.

७) ह्या जगात १००% तंतोतंत भविष्य कोणीही वर्तवु शकत नाही, हाच पहिला नियम आहे. जसे डौक्टर रोग्याचे जीव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. तसेच खरा अभ्यास असलेला ज्योतिषी सुध्दा आपला तर्क, अनुभव व दैवी उपासनेच्या आधारे जातकाच्या प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ-जवळ जाण्याचा प्रयत्नच करीत असतो. पत्रिका पहाते वेळी

मुख्यत्वे दोनच गोष्टी पाहिल्या जातात.

  • एखादी घटना होणार आहे की नाही हे प्रथम पाहिले जाते.
  • दुसरी गोष्ट पाहतात ती म्हणजे जर ती घटना जर घडणार असेल तर कधी व कोणत्या वेळी तसेच कोणत्या पध्दतीने घडणार हे समजते.

श्री.स्वामी विवेकानंदाच्या मते अती-आर्थिक संकट समयी तसेच ८०% प्रयत्न करून जर अपयश प्राप्त होत असेल तरच अशा दोनच प्रसंगी खरे तर ज्योतिष पहावे न उठ-सुठ केव्हाही व आंधळेपणाने.

careful
apps-banner
यजमान आणि यात्रेकरुकरीता महत्त्वाची माहिती   
© Copyright 2015 All rights reserved at Shikhare B. S.