श्राध्द म्हणजे काय
आपल्या पिढीजात परंपरांचे स्विकृत तत्व म्हणजे मनुष्य प्राणी मृत्यु पावतो परंतु त्याचा आत्मा मात्र अमर आहे. तो नष्ट होत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये आई-वडिलांच्या आपल्या मुलांविषयी ममतेला महत्त्व आहे. तसेच आई-वडिल हयात असतांना मुलाच्याही त्यांच्या संदर्भात काही जबाबदार्या आहेत. त्यांच्या उतारवयात त्यांची व्यवस्थित देखभाल करणे, त्यांचा योग्य तो मान-सन्मान ठेवणे वगैरे. आई-वडिलांच्या पश्चातही त्यांच्या मुलांच्या काही जबाबदार्या त्यापैकी महत्वाची म्हणजे 'श्राध्द' ह्या एक विशिष्ट पध्दत आपल्या धार्मिक परंपरेत आपल्या पुर्वजनांनी घालवून दिलेली आहे. श्राध्द जर विधीपुर्वक केले तर आपले पितर संतुष्ट होतात. आपल्या वारसांना दिर्घायुष्याचा, प्रसिध्दीचा, शक्तिचा, उत्तम प्रकृतीचा आणि लौकिक सुखाचा, धनसंपदेचा आर्शिवाद देतात.
मृत मातापित्यांसाठी विधिपूर्वक केलेल्या आपल्या पारंपारिक शास्त्रामध्ये पितृयज्ञ असे म्हटले आहे. आपल्या पारंपारिक शास्त्रात मयत पितरे आपल्या कुटूंबाचे मृत्युनंतरही रक्षण करतात असे नमुद केलेले आहे आणि म्हणुनच वारसांची ही अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या पितरांना प्रसन्न ठेवावे.
विविध तर्हेच्या श्राध्दाच्या पध्दतीचे विवरण पुढीलप्रमाणे