सिंहस्थ कुंभपर्व शाहिस्नानाचे आखाडे

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीचे तिर्थराज कुशावर्त हे प्रसिध्द तिर्थ आहे. येथुनच पुढे गोदावरी नदी रूपाने वहाते. येथेच पुर्वी महर्षी गौतमांचा आश्रम होता. जगदगुरू आद्य शंकराचार्याचेही येथे स्थान आहे. महाकुंभ पर्वाचे वेळी येथे शाहीस्नानाकरिता येणारे दसनाम संन्याशी आदी सांधुचे व मंहतांचे आखाडे आहेत. त्याचा परिचय - संन्याशी दशनाम यांच्या तिर्थ, आश्रम, सरस्वती, भारती, गिरी, पुरी, वन पर्वत आणि सागर हे होत. फार पूर्वी यांची एकत्र अशी संघटना होती मात्र कालांतराने त्यांच्यात मतभेद होऊन आखाडे रूपाने त्यांची विभागणी झाली ती पुढीलप्रमाणे

श्री निरंजनी आखाडा

हा आखाडा संवत ९६० सन ८२६ मध्ये सोमवार रोजी मांडवी (कच्छ) येथे स्थापना झाली. त्यांचे इष्ट दैवत ''कार्तिकस्वामी'' आहे. त्यांच्यात नियमबध्द नागे, साधु मंहत व महामंडलेश्वर यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या शाखा प्रयाग (अलाहाबाद), हरिद्वार, उज्जैन व त्र्यंबकेश्वर तसेच ओकांरेश्वर, उदयपुर व ज्वालामुखी येथे आहेत. त्यांचे स्नान पहाटेच असते.

श्री जुनादत्त (भैरव) आखाडा

हा आखाडा संवत १२०२ सन १०६९ मध्ये कार्तिक शुध्द दशमीस कर्णप्रयाग येथे स्थापन झाला. त्यांचे इष्टदैवत ''श्री रुद्रावतार दत्तात्रय'' यांच्यात नियमबध्द नागे, साधु मंहत व महामंडलेश्वर यांची संख्या मोठी आहे. तसेच त्यांच्यात अवधुतानिया पण असतात. त्यांच्या शाखा प्रयाग (अलाहाबाद), हरिद्वार, उज्जैन व त्र्यंबकेश्वर, काशी व ओकांरेश्वर येथे आहेत. यांचे स्नान पहाटेच असते.

श्री महानिर्वाणी आखाडा

हा आखाडा संवत ८०५ सन ६७१ मध्ये मार्गशीर्ष शुध्द दशमीस झारखंड वैजनाथ धाम (बिहार) प्रांत येथे स्नापना झाली. त्यांचे इष्टदैवत ''श्री कपिल महामुनी'' आहेत. यांच्यात नियमबध्द नागे, साधु मंहत व महामंडलेश्वर यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या शाखा प्रयाग (अलाहाबाद), हरिद्वार, उज्जैन व त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर व कनखन येथे आहेत. यांचे स्नान पहाटेच असते.

श्री अटल आखाडा

हा आखाडा संवत ७०३ सन ५६९ मध्ये मार्गशीर्ष शुध्द चतुर्थीस गोंडवन येथे स्थापन झाला. यांचे इष्ट दैवत ''श्री गजानन'' (गणपती) आहेत. यांच्यात नियमबध्द नागे, साधु मंहत व महामंडलेश्वर यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या शाखा प्रयाग (अलाहाबाद), हरिद्वार, उज्जैन व त्र्यंबकेश्वर, काशी आजर व बडोदा येथे आहेत. यांचे स्नान पहाटेच असते.

श्री आवाहन आखाडा

हा आखाडा संवत ६०३ सन ४६९ मध्ये ज्येष्ठ नवमीस स्थापन झाला यांचे इष्टदैवत ''श्री दत्तात्रेय '' व ''श्री गजानन'' आहेत. हा आखाडा जुना दत्त आखाडा बरोबरच असतो. यांचे केंद्रस्थान ''काशी'' आहे. त्यांच्या शाखा प्रयाग (अलाहाबाद), हरिद्वार, उज्जैन व त्र्यंबकेश्वर, येथे आहेत. यांचेही स्नान पहाटेच असते.

श्री आनंद आखाडा

हा आखाडा संवत ९१२ सन ७७८ मध्ये ज्येष्ठ स्थापन झाला यांचे इष्टदैवत ''श्री अग्नि '' व ''श्री सुर्यनारायण'' आहेत. हा आखाडा निरंजनी आखाड्या बरोबरच असतो. यांच्यातही नियमबध्द नागे, साधु मंहत व महामंडलेश्वर यांची संख्या मोठी असते. त्यांच्या शाखा प्रयाग (अलाहाबाद), हरिद्वार, उज्जैन व त्र्यंबकेश्वर, येथे आहेत. यांचेही स्नान पहाटेच असते.

श्री पंच अग्नि आखाडा

हा आखाडा सन १०५८ मध्ये आषाढ शुध्द एकादशीस स्थापन झाला यांची इष्टदेवता ''गायत्री'' आहे यांचे प्रधान केंद्र स्थानी ''काशी'' आहे. यांच्यात चारही पीठांचे शंकराचार्य, ब्रम्हचारी, साधु व महामंडलेश्चर यांची मोठी संख्या आहेत. यांच्या प्रयाग (अलाहाबाद), हरिद्वार, उज्जैन व त्र्यंबकेश्वर, येथे आहेत. यांचेही स्नान पहाटेच असते.

श्री नागपंथी गोरक्षनाथ आखाडा

हा आखाडा संवत ९०० सन ८६६ मध्ये त्र्यंबकेश्वरी अहिल्या - गोदावरीच्या संगमावर स्थापन झाला त्यांचे संस्थापक पीर शिवनाथजी आहेत. त्यांचे मुख्य दैवत ''गोरक्षनाथ'' असून यांच्यात बारा पंथ आहेत. हा सांप्रदाय योगिनी कौल नावाने प्रसिध्द यांची त्र्यंबंकेश्वर येथील शाखा ''त्र्यंबकं मठिका'' नावाने प्रसिध्द आहे. याशिवाय राजामठकद्री (म्हैसुर) येथेही शाखा आहे. यांचे त्र्यंबकेश्वरीचे एकच स्नान असते. ते फक्त ''नागपंचमीस'' असते.

श्री वैष्णव आखाडा

हा बालानंद आखाडा संवत १७२९ सन १५९५ मध्ये दारागंज येथे ''श्री मध्यमुरारी'' यांनी स्थापन केला. कालांतराने यांच्यात निर्मोही, निर्वाणी, खाकी आदी तीन सांप्रदाय झाले. यांचे शाही स्नान दशनामी सांधुचे स्नान झाल्यावर होते. यांचा त्र्यंबकेश्वर येथे आखाडा मारूती मंदिराजवळ होता. सन १८४८ पर्यत स्नान शाही त्र्यंबकेश्वरीच होत असे पण सन १८४८ मध्ये ''शैव'' व ''वैष्णव'' यांचेपैकी आधी स्नान कोणाचे ह्या मुद्यावरून असे भांडण झाले की १८,००० च्या वर सांधुची अक्षरक्ष: कत्तल झाली. त्यामुळे अखेर पेशव्यांना मध्यस्थता करून वाद मिटवावा लागला. त्यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वराजवळील ''चक्रतिर्थावर'' स्नान केले. कालांतराने म्हणजेच १९३२ पासून ते नाशिक येथे करू लागले. आजही ते याच ठिकाणी म्हणजेच नाशिक येथेच स्नान करतात. (म्हणून त्यावेळेपासून नाशिक येथे कुंभमेळा सुरू झाला. त्यामुळे अफवा ती अफवाच व खरे ते शेवटी खरेच त्यामुळे खरे सांगण्यासाठी ढोल बडवावा लागत नाही. सुज्ञ व्यक्तिनी स्वत:च ठरवून स्वत:च निर्णय घ्यावा हेच योग्य व तेच उत्तम)

श्री उदासिन पंचायती बडा आखाडा

हा आखाडा संवत १८४४ सन १९१० मध्ये स्थापन झाला. या सांप्रदायाचे संस्थापक श्री चंद्रआचार्य उदासिन होते. त्यांच्यात सांप्रदायिक भेद आहेत. यांच्यात उदासिन साधु, मंहत व महामंडलेश्वर यांची संख्या मोठी आहे. त्याच्या, शाखा प्रयाग, हरिद्वार, उज्जैन, त्र्यंबकेश्वर, भदैनी, कनखन, साहेबगंज मुलतान, नेपाळ व मद्रास (चेन्नई) येथे आहेत. यांचे शाही स्नान सूर्योदयानंतर असते.

श्री उदासिन नया आखाडा

हा आखाडा संवत १९०२ सन १७१० मध्ये स्थापन झाला. वरील बडा उदासिन आखाडया पैकीच काही सांधुनी विभक्त होऊन स्थापन केला. यांचे प्रर्वतक ''मंहत सुधीरदासजी'' होते. यांच्यात नया उदासिन आखाडयाचे सांप्रदायी सांधु, मंहत, व महामंडलेश्वर यांची सेख्या मोठी आहे. त्याच्या, शाखा प्रयाग, हरिद्वार, उज्जैन, त्र्यंबकेश्वर, यांचे शाही स्नान सूर्योदयानंतर असते.

श्री निर्मल पंचायती आखाडा

हा आखाडा संवत १९१८ सन १७८४ मध्ये स्थापन झाला. १७८४ मध्ये हरिद्वार कुंभमेळ्याच्यावेळी एक मोठी सभा घेऊन विचार विनिमय करून ''श्री दुरगाहसिंह महाराज'' यांनी स्थापना केली. त्यांचे इष्टदेव ''श्री गुरूनानक ग्रंथसाहेब'' आहेत. यांच्यात सांप्रदायी साधु, मंहत व महामंडलेश्वर यांची संख्या मोठी आहे. त्याच्या, शाखा प्रयाग, हरिद्वार, उज्जैन, त्र्यंबकेश्वर, येथे आहेत. यांचे शाही स्नान उदासिन आखाड्याचे शाही स्नान झाल्यावर सर्वात शेवटी असते.

careful
apps-banner
यजमान आणि यात्रेकरुकरीता महत्त्वाची माहिती   
© Copyright 2015 All rights reserved at Shikhare B. S.