अमृतकुंभ व्याख्यान

पुरा प्रवृते देवानाम देवैसह महारणे। समुद्रमंथनाप्राप्तं सुधाकुंभ तदा सुरै ।।
तस्मात्कुंभात्समुत्पत्र: सुधाबिंदु महीतले। यत्रयत्रापनत तत्रकुंभपर्व प्रक्रिर्तित ।।

(स्कंदमहापुराण)

ज्यासुखासाठी सर्व जग प्रयत्न करीत आहे. त्यासुखाची राखरांगोळी करणारा मृत्यु कोणास प्रिय वाटेल? अशा मृत्युपासून सुटका करून घेण्यासाठी जगात उत्पत्ती पासून मानव काही उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. देव मानसापेक्षा श्रेष्ठ म्हणून ते मरणाधीन नसणार व ते अमर असण्याचे कारण अमर करणारी वस्तु त्यांचे जवळ आहे. ती वस्तु म्हणजे ''अमृत'' हा शब्द वैदिक वाङमयात अनेक ठिकाणी आलेला आहे. या अमृताचे उत्पत्तिची कथा अशी कृतयुगात एकदा ऐरावतावर बसलेल्या इंद्रास पाहुन संतुष्ट झालेल्या ''दुर्वास'' ऋषींनी आपल्या गळयातील माळ काढून प्रसाद म्हणून इंद्रास अर्पण केली पण इंद्राने तात्काळ तिचा स्वीकार न केल्याने ती माळ खाली पडली व ऐरावताच्या पायाखाली तुडवली गेली. त्यामाळेची अवस्था पाहून अत्यंत क्रुध झालेल्या ऋषींनी इंद्रास तुझे एश्वर्य व इंद्रपद नष्ट होईल असा शाप दिला. त्याने इंद्र व सर्व देवांचे सामर्थ्य नष्ट होऊन हतवीर्य झालेल्या देवांना दानवांकडून वारंवांर पराभव पत्करावा लागला. त्यावेळी दैत्याचा राजा ''त्रिपुरासूर'' राज्य करीत होता. तेव्हा ब्रम्हदेवांसह सर्व देवतागण ''विष्णू'' देवास शरण गेले असता, श्री विष्णूनी त्यांना सांगितले की तुम्ही दैत्यांशी समझोता करून त्यांच्या मदतीने ''समुद्रमंथन'' करा त्यातुन तुम्हास अमृताची प्राप्ती होईल आणि अमृताच्या प्राशनाने तुम्हास अमरत्व प्राप्त होऊन तुम्ही दैत्यांकडून पराजित होणार नाही. विष्णूची युक्ति सर्व देवांना पसंत पडली. लागलीच सर्व देव त्रिपुरासूराकडे गेले आणि समुद्रमंथनाची कल्पना त्यांचे पुढे मांडली. त्रिपुरासुराने समुद्रमंथनातून निघणारे अमृत अर्धे आम्हास दिले पाहिजे ह्या अटीवर समुद्रमंथनास येण्याचे कबुल केले. त्यानंतर देव दानवांनी मिळून ''मंदार'' नावाचा पर्वत उचलून क्षीरसागराजवळ आणला व दोर म्हणून ''वासुकी'' सर्पास अमृताचा वाटा देण्याचे कबुल करून आणण्यात आले व त्याचा मंदारला वेढा देण्यात आला. शेपटाकडील बाजूस देव व तोंडाकडून दानव धरून समुद्रमंथनास आरंभ केला, परंतु मंदारला खाली आधार नसल्याने तो जड होऊ लागला तेव्हा श्री. विष्णुंनी कासवाचे रूप (कुर्मावतार) धारण करून मंदारला खालून आधार दिला मग समुद्रमंथनाचे कार्य सुरळीत सुरू झाले. या समुद्रमंथनातून खालील रत्ने निघाली.

लक्ष्मी: कौस्तुभपारिजातकांसुरा धनवंतरीचंद्रमा । गाव: कामदुधा: सुरेश्वरगणे रंभादिदेवांगना ।।
अश्वसप्तमुख: सुधा हरिधनु: शंखो विषचांबुधे । रत्नानिती चतुद्रशं प्रतिदिन कुर्वन्तु वै मंगलम ।।

या इतर रत्नांबरोबरच ''श्री धन्वंतरी'' हातात अमृताचा कलश घेऊन आलेले पाहाताच देवांनी दैत्यांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी भगवान विष्णुचे संकेतानुसार देवगुरू बृहस्पतीच्या देखरेखीखाली इंद्रपुत्र 'जयंत' याने तो कलश हस्तगत केला व कुंभाते संरक्षणासाठी भगवान ''चंद्राची'' नियुक्ती करण्यात आली. दानवांनी देवाचा पाठलाग सुरू केला. देव अमृतकलश घेऊन स्वर्ग, मृत्युलोक व पाताळ या तीनही लोकी हिंडले. त्यापैकी मृत्युलोकी देवांचे बारा दिवस म्हणजे मानवांचे बारा वर्षे होतात. या अवधित देवांनी तो कुंभ चार ठिकाणी ठेवले होते ते स्थान म्हणजे ''हरिद्वार'', ''प्रयाग'', ''त्र्यंबकेश्वर'' आणि ''उज्जैन''. तो पूर्ण कुंभ ठेवतांना व उचलतांना काही अमृतांचे थेंब येथे सांडले तेव्हापासून या चार स्थानानांचा अमृतक्षेत्र मानून अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. या पौराणिक कथेचा विचार करता वाचकांच्या लक्षात येईल की ''सिंहस्थ कुंभमेळा'' श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरीच भरतो. कारण ज्यावेळेस समुद्रमंथन झाले त्यावेळी सत्ययुग होते आणि मंदारला आधार देण्यासाठी श्री. विष्णुंनी कुर्मावतार धारण केला होता तसेच गंगावतरण ही घटना याचकाळातील. सध्या प्रचलित असलेले नाशिक क्षेत्र हे प्रभु श्रीरामचंद्र वनवासात पंचवटीत रहात होते म्हणून प्रसिध्द झाले, ही घटना द्वापर युगातील आहे. (मागील भागात दिलेल्या सत्यकथेवरून एवढेच सिध्द होते की सत्ययुगापासून व्यापारयुगापर्यंत सिंहस्थ कुंभमेळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेच भरत होता. पितळ जरी पिवळे दिसत असले तरी त्यास सोन्याची किंमत येत नाही) म्हणूनच सर्व पातकांपासून मुक्त होऊन अमृतप्राप्तिने अध्यात्मिक ज्ञानाकडे प्रवृत्त होण्यासाठी चिदरसात परिप्लुत मुल गोदावरीत स्नान करण्यासाठी ''तिर्थराज कुशावर्तवरच'' यावे.
इति शुभं भवंतु ।

अशी अवतरली गंगा

कृते लक्षद्वयातीते मांधतरी शके सति । कुर्मेचैवतारेच तथा सिंहगते गुरू ।।१।।
माघ शुक्ल दशम्याच माघ्यान्हे सौम्यवासरे । गंगा समागता भूमी गौतम प्रार्थिता सति ।।२।।

कृतयुगात मांधाता शके चालू असतांना गुरू सिंह राशीत असून माघ मासातील दशमीस माध्यान्हि 'कंलिमलहारिणी' गंगा (गोदावरी) ऋषि गौतमांच्या प्रार्थनेने पृथ्वीतलावर अवतीर्ण झाली. या गौतमी गंगेच्या उत्पत्ती संबंधी असलेली पौराणिक कथा थोडक्यात पुढीलप्रमाणे......

त्रिसंध्या क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या परिसरात पूर्वी शारदाकुलात जन्मलेले ''गौतम'' नावाचे ऋषि निवास करीत होते. त्यांच्या पत्निचे नांव ''अहिल्या" होते. त्यांच्या अतिव तपश्चर्येमुळे व सेवाधर्माच्या वाढत्या पुण्याईने देवराज इंद्राला पदच्युत होण्याची भिती निर्माण झाली. त्याने कारस्थान करून गौतमाला गोहत्येचे पातक घडविले. शंकराचे जटाजुटातील पापहारीणी गंगेच्या पवित्र जलाने स्नान केल्यावाचून या पातकापासून सुटका होणार नाही. त्यासाठी बारा वर्षे तपश्चर्या करून भगवान रुद्रास (शंकरास) प्रसन्न करून घेतले आणि आपल्या जटेतील गंगा गोहत्येच्या पातकापासून मुक्त होण्यासाठी मजला द्यावी असा वर मागितला. तेव्हा शंकराने गंगेस भूमंडळी जाण्यास सांगितले. परंतु गंगा भूतलावर जाण्यास तयार होईना. तेव्हा शंकराने रागाने आपल्या जटा आपटून गंगेचा त्याग केला. (हे स्थान अद्याप सुस्थितीत आहे व ते स्थान अद्याप दाखविले जाते) त्यामुळे गंगेस पृथ्वीवर येणे भाग पडले. गंगामातेने मानवी स्वरूप धारण करून शंकरास विनंती केली की गौतम ऋषिंना गोहत्येच्या पातकापासून मुक्त करणे हे माझे भूमंडळी अवतिर्ण होण्याचे कारण आहे तर तेव्हा कार्य पूर्ण झाल्यावर मी येथून निघून जाईल, आणि जर सर्व मानवांच्या उध्दाराकरिता मी भूमंडळी कायम वास्तव्य करावे असे आपणांस वाटत असेल तर माझे उगमस्थानी सर्व पवित्र नद्या, तिर्थे व देवता यांनी सिंह राशीत गुरू आला असता १३ महिने वास्तव्यास आले पाहिजे व त्याचप्रमाणे अग्रपुजेचा मान मला मिळाला पाहिजे अशी अट घातली. ही अट सर्वांनी मान्य केली तेव्हापासून गंगा प्रवाह रूपाने वाहू लागली. त्यावेळेपासूनच श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरी सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाला. त्याचप्रमाणे ब्रम्हगिरी पर्वतावर औंदुबराचे मुळापासून गौतमी गंगेचा प्रवाह सुरू झाला. परंतु गौतम ऋषिंना स्नान होईना. तेव्हा पर्वताच्या पायथ्याशी जेथे गंगेचा ओघ प्रथम दृष्टीस पडला तेथे त्यांनी अभिमंत्रित दर्भांनी गंगेचा ओघ अडवून स्नान केले म्हणूनच या तिर्थास "कुशावर्त" (कुशै: आर्वत: इति) ही संज्ञा प्राप्त झाली. हेच तिर्थराज कुशावर्तच गोदावरीच्या प्रवाहाचे आरंभ स्थान आहे.

तिर्थराज कुशावर्त

कुंशेनावर्तिता गंगा गौतमेन महात्मना । कुंशावर्तमिती ख्यात त्रिघु लोकेषु विश्रुतम् ।।

कुशावर्त हे परम पवित्र तिर्थ त्र्यंबकेश्वर गावाच्या मध्यभागी आहे. शास्त्रीय आधारानुसार ज्यास चार कोन असतात त्यास ''तिर्थ'' तर ज्यास सहा कोन असतात त्यास ''तिर्थराज'' अशी संज्ञा दिली जाते. त्यामुळे कुशातर्व तिर्थास ''तिर्थराज''असे म्हणतात. या परम पवित्र तिर्थाची बांधणी हेमाडपंथी पध्दतीची आहे. तिर्थाच्या सभोवती दक्षिण, पश्चिम, व उत्तर दिशांना साधारण चार उंचीच्या ओवर्‍या बांधलेल्या आहेत. या ओवर्‍याच्या बाजुने मजबुत कोटाने वेष्टित आहेत. बाह्यभागावर गंगावतरणाचे वेळी ज्या देवता, ऋषि, व ऋषि पत्नि कार्यान्वित होत्या, त्यांची शिल्प व भरपूर नक्षीकाम आहे. आग्नेय कोनास शिवालय, नैऋत्य कोनास गणपतीची भव्य मूर्ती आहे. तिर्थापासून या गौतमी गंगेस ''गोदावरी'' हे नामभिधान प्राप्त झाले. कारण ''गोदा'' या शब्दाचा अर्थ असा होतो.

''गौतमस्य गां जीवन ददाति इति गोदा''

गौतम ऋषींनी गोहत्येच्या पातकापासुन मुक्त करून गाईस जीवनदान देणारी म्हणून ही नदी गोदावरी म्हणून ओळखली जाते. या गौतमी गंगेच्या यात्रेच्या निमित्ताने शास्त्रकारांनी या तिर्थराज कुशावर्तास अग्रपुजेचा मान दिला आहे. कारण

त्रिकांटके शोभामान त्र्यंबंक नामनात । तत्र तिर्थ कुशावर्त त्रिघु लोकेश विश्रुतम ।।

असे हे कुशावर्त तिर्थ वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे तीनही लोकात प्रसिध्द आहे. म्हणूनच या तिर्थाबद्दल ''त्वं राजा सर्वतिर्थानाम्'' असे लिहीलेले आहे. ज्याप्रमाणे कुरूक्षेत्रातील ''शर्यणावत'' तीर्थात स्नान केले असता त्या तिथ्‍सिंह राशीत गुरू आला असता तिर्थराज कुशावर्तातील गंगेचे पवित्र जल चिदरसात परिलुप्त होते. या तिर्थात सिंहस्थ पर्वकाली स्नान-दान केले असता मनुष्य सर्व पापांपासुन मुक्त होऊन अध्यात्मज्ञानाकडे प्रवृत्त होतो. जसे रामायणातील उल्लेखाप्रमाणे प्राचिन काली प्रभु रामचंद्रांनी कुशावर्त सिंहस्थकाळात येवून यथाविधी यात्रा केली. हा इतिहास पुढे देत थोडक्यात आहे तो असा की ज्यावेळी श्री. प्रभु रामचंद्र वनवासात असतां काहीकाळ पंचवटी (नाशिक) येथे वास्तव्य करीत असतांना आपले पिता दशरथ स्वर्गवासी झाले अशी बातमी प्राप्त झाल्याने शोक करीत असता एके दिवशी प्रभु रामचंद्राच्या स्वप्नात राजा दशरथ येऊन सांगितले की ''मला अद्याप उत्तम मुक्ती मिळाली नाही. तेव्हा मला उत्तम मुक्ती मिळण्यासाठी तु प्रयत्न कर ''तेव्हा प्रभु रामचंद्रानी जवळ रहात असलेल्या ''कश्यप'' ऋषिच्या आश्रमात जाऊन आपल्याला स्वप्नात झालेला दृष्टांत सांगितला. तेव्हा कश्यपी ऋषिंनी प्रभु रामचंद्रास पुढील उपदेश केला की,

सिंहस्थेच सुरगुरौ दुर्लभं गौतमी जलम् । यत्रकुंत्रापि राजेद्र कुशावर्म विशेषत: ।।
तवभाग्येन निकटे वर्तते ब्रम्हभूधर: । सिंहस्थो पि समायात: तंत्र गत्या सुखीभव ।।
सिंहसथेतु समायते राम: कंश्यप संयुत: त्र्यंबकंक्षेत्र मागंल्य तिर्थयात्रां चकांर ह ।।

careful
apps-banner
यजमान आणि यात्रेकरुकरीता महत्त्वाची माहिती   
© Copyright 2015 All rights reserved at Shikhare B. S.