विधीसाठी आवश्यक साहित्य
मुहूर्त पुढे दिलेलेच आहे. याप्रमाणे जी तारीख सोयीची असेल त्याप्रमाणे पंधरा दिवस अगोदर कळविणे आवश्यक आहे. तारीख नक्की कराल त्याचे आदल्या दिवशी येथे सायं. ६.०० वाजेपर्यंत मुक्कामास यावे लागेल. पुढे दिलेल्या संपर्काच्या सदरात आमचा पत्ता व फोन नंबर व फोनची वेळ दिलेली आहे. कृपया फोनद्वारेच संपर्क साधावा. (फोन करते वेळी आपल्यास काही शंका असल्यास कृपया मोजक्या शब्दात व थोडक्यात विचारावी म्हणजे आपणांस निरसन करून सांगण्यास बरे पडेल.)
पुढे दिल्याप्रमाणे वस्त्र कोरे आणि नविन आणावीत.
पुरुषांसाठी : १ धोतर १ बनियन, १ अंडरवेअर, १ टॉवेल, १ नॅपकिन (प्रत्येक विधीसाठी स्वतंत्र वस्त्र आणावीत.)
स्त्रियांसाठी : १ साडी (पांढरा, हिरवा, लाल, काळा हे रंग सोडून रंगीत प्रिंटेड साडी आणावी) १ ब्लाऊज, १ परकर, १ मापाचे शिवून आणावे. तसेच इतर इत्यादी कपडे आणावेत. (प्रत्येक विधीसाठी स्वतंत्र वस्त्र आणावीत.)
प्रत्येक विधीचा खर्च पुढीलप्रमाणे
नारायण-नागबली | रु. ६००१/- + १ ग्रॅंम सोन्याचा नाग (दोघांचे रहाणे व जेवणासहीत) |
त्रिपिंडी श्राध्द | रु. ३५००/- (दोघांचे रहाणे व जेवणासहीत) |
कालसर्प शांती | रु. ४०००/- (दोघांचे रहाणे व जेवणासहीत) |
नारायण- नागबली विधीसाठी सोन्याचा नाग वेगळा करावा लागेल तो 'त्र्यंबकेश्वरी' येऊनच करावा. जास्त माणसे आणल्यास व तसे पूर्वसूचित केल्यास सशुल्क राहण्याची व्यवस्था आम्ही करू शकतो. पण तशी व्यवस्था काही कारणाने आम्ही करू न शकल्यास त्यांची व्यवस्था आपणच करावी. तसे आम्ही आपणांस सांगूच. त्यास आम्ही बांधिल नाही. आपणांस जी खोली रहावयास घ्यावयाची आहे त्या प्रत्येक खोलीत दोन ठिकाणी दोन वा तीन अथवा चार माणसेच उतरण्याची मुभा आहे. त्याप्रमाणे आपण किती जण येणार हे कळविणे अत्यावश्यक आहे. पण कामाच्या व्यतिरिक्त शक्यतो जास्त माणसे आणूच नये. नारायण - नागबळी विधीसाठी आपले आई-वडिल हयात नसल्यास क्षौर (केस काढणे) बंधनकारक राहील. शंका समाधानासाठी आपली 'जन्मपत्रिका' आणावी. आपले उत्तर लवकरात लवकर कळवावे. घरातील सर्वांस त्र्यंबकराज चांगले आयु-आरोग्य देवो हिच सदिच्छा
विशेष सुचना
मुहूर्त काल विचार
त्रिपादपंचकं वर्ज्य प्रारंभ्ये तु बलिद्वये ।
अन्य दोषस्य संप्राप्तीरस्मिन कार्य न दु:ख ।।
वरील नियमाप्रमाणे नारायण - नागबली कर्मास धनिष्टा पंचक व त्रिपाद नक्षत्रे म्हणजे कृत्तिका, पुनर्वसु, उत्तरा फाल्गुनी, विशाखा फाल्गुनी, उत्तरषाढा ही नक्षत्रे होत.
गुरू भार्गवयोमौढये पौषमासे मलिम्लुचे ।
नातीत: पितृमेध: स्याद्वयां गोदावरी विना ।।
वरील नियमाप्रमाणे गुरू शुक्रांच्या अस्तामध्ये व मलमासात तसेच पौषमासामध्ये करू नये असा जरी नियम असला तरी हा नियम येथे लागू पडत नाही असे वरील शास्त्रवाचन आहे. कारण गोदावरी उगमस्थानावर त्याचा दोष रहात नाही. (निर्णय सिंधु # पान ६२२)
कर्माचा अधिकारी विचार
चातुर्वेर्ण्येन कर्तेव्यो बलिनारायणोsभिद ।
नारायण - नागबली विधी सर्व वर्णीयास करण्याचा अधिकार आहे. हा विधी आई-वडिल हयात असतांना अथवा नसतांनाही करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. वडील नसेल तर क्षौर (केस काढणे) करणे आवश्यक तसेच बंधनकारक आहे.
विवाह झालेल्या व्यक्तींना सपत्नीक विधी करावा लागेल. पत्नी हयात नसल्यास एकटया पुरुषाला विधी करण्याचा अधिकार आहे. काही जणांमध्ये फार गैरसमज निर्माण झालेला आहे की घरामध्ये एकाने विधी केल्यास बाकी कोणाला परत विधी करण्याची जरूर नाही. परंतु असे नाही सर्वजणांना व घरातील प्रत्येकाने स्वतंत्र विधी केल्यास फारच उत्तम. ज्या घरात पुरूष नाही त्यांनी ब्राम्हणाकरवी विधी करवून घेऊ शकतो. एकटया स्त्रीला विधी करण्याचा अधिकार नाही.
या विधींसंबंधी समग्र माहिती इतर ठिकाणच्या शास्त्रीपंडितास नाही कारण हा विधी या क्षेत्राचेच वैशिष्ट आहे. त्यामुळे हा प्रयोग करण्याची शास्त्रीय परंपरा येथेच ठरविली आहे. हा विधी करण्याकरीता सर्व भारतातून दरसाल हजारो लोक येतात. पुष्कळशा लोकांचे मनोरथ पूर्ण झाल्याचे दाखले येथे पहावयास मिळतात. तसेच पैशाचादिक बाधा असल्यास ती दूर होते. क्वचित द्रव्यलोभास्तव त्यावर असलेल्या नागाची हत्या केली असल्यास तो नाग त्या माणसाचे अंगात येऊन मुक्ती घेतो. उदाहरणे पहावयास मिळतात. ज्यांना विवाह झाल्यानंतर १५ ते २० वर्षात संतती झाली आहेत. ज्यांनी फक्त कन्या संतती होत आहे, परंतु पुत्रप्राप्ती होत नाही अशांना हा विधी केल्यानंतर पुत्रप्राप्ती झाल्याची उदाहरणे आहेत. ज्यांची संतती होऊन वाचत नाही तसेच असणार्या संततीस आरोग्य लाभत नाही, त्या सर्वांना या विधीचा उपयोग झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत. ती नावे सुध्दा सविस्तर देता येणे शक्य नाही. कारण त्याचाच ग्रंथ होऊन बसेल. थोडक्यात म्हणजे शास्त्रकारांनी प्रपंचात येणारी नानाविध दु:खे यांचा परिहार व्हावा म्हणून दृष्य व अदृष्य कारणे यांचा विचार करून त्यांच्या परिहाराकरिता जी विधाने करण्यास सांगितली आहेत त्यापैकीच अनुभव सिध्द असे हे वैदिक अनुष्ठान आहे. यास श्रध्देची पूर्ण आवश्यकता आहे. कारण 'श्रध्दावान लभते ज्ञानम्' असा सिध्दांत आहे. तरी श्री त्र्यंबकेश्वर महाराजांचे चरणी पूर्ण श्रध्दा छेवून आपले संसार सुखाची पुर्तता करून घ्यावी.
नारायण-नागबली विधीचे 2023 सालातील मुहूर्त
ऑक्टोबर 2023 | 1, 4, 8, 11, 29 |
नोव्हेंबर 2023 | 1, 4, 7, 17, 19, 25, 28 |
डिसेंबर 2023 | 2, 5, 9, 12, 16, 22, 25, 29 |
नारायण-नागबली विधीचे 2024 सालातील मुहूर्त
जानेवारी 2024 | 1, 4, 9, 13, 18, 22, 26, 29 |
फेब्रुवारी 2024 | 2, 9, 14, 18, 22, 25, 28 |
मार्च 2024 | 3, 8, 13, 16, 20, 23, 26, 30 |
एप्रिल 2024 | 4, 9, 12, 16, 20, 24, 27 |
मे 2024 | 1, 7, 10, 14, 17, 20, 24, 28 |
जून 2024 | 3, 6, 10, 13, 16, 20, 25 |
जुलै 2024 | 3, 7, 10, 13, 17, 22, 28, 31 |
ऑगस्ट 2024 | 4, 7, 11, 14, 18, 24, 28, 31 |
सप्टेंबर 2024 | 3, 13, 15, (20, 23, 27, 30) |
ऑक्टोबर 2024 | 18, 21, 24, 27 |
नोव्हेंबर 2024 | 4, 7, 24, 27 |
डिसेंबर 2024 | 1, 6, 12, 15, 18, 21, 24, 28 |
त्रिपिंडी श्राध्द व कालसर्प शांतीच व इतर जनन शांतीचे 2023 सालातील मुहूर्त
ऑक्टोबर 2023 | 3, 6, 7, 10, 13, 14, 25, 26 |
नोव्हेंबर 2023 | 3, 6, 9, 11, 19, 21, 22, 24, 27, 30 |
डिसेंबर 2023 | 4, 7, 11, 14, 18, 19, 21, 24, 27, 31 |
त्रिपिंडी श्राध्द व कालसर्प शांतीच व इतर जनन शांतीचे 2024 सालातील मुहूर्त
जानेवारी 2024 | 3, 6, 7, 11, 15, 17, 20, 24, 28 |
फेब्रुवारी 2024 | 4, 11, 13, 16, 20, 24, 27 |
मार्च 2024 | 1, 6, 10, 11, 12, 15, 18, 22, 25, 28 |
एप्रिल 2024 | 2, 7, 11, 14, 18, 22, 26, 29 |
मे 2024 | 3, 6, 9, 12, 16, 19, 22, 26, 27, 30, 31 |
जून 2024 | 2, 5, 8, 12, 18, 22, 23, 27 |
जुलै 2024 | 5, 9, 12, 15, 19, 24, 26, 30 |
ऑगस्ट 2024 | 2, 6, 9, 13, 16, 20, 22, 23, 26, 30 |
सप्टेंबर 2024 | 2. 5. 15. 17, 19 |
ऑक्टोबर 2024 | 14, 16, 20, 23, 26, 29 |
नोव्हेंबर 2024 | 6, 9, 23, 26, 29 |
डिसेंबर 2024 | 4, 8, 9, 11, 14, 17, 20, 23, 26, 30 |
वरील सर्व मुहूर्त आमचे व येथील परिस्थितीनुसारच आम्ही ठरविलेले आहेत, त्यात बदलाची कृपया अपेक्षा धरू नये.
महत्वाचे पण विशेष
१) नागपंचमीस कालसर्पयोग शांतीस व पितॄपंधरवड्यात नारायण-नागबली व त्रिपिंडी श्राध्द ह्या विधी करण्याचे अति-महत्वाचे आहे, हे मानणे सर्वथा निर्रथक १००% चुकीची समज समाजात रुढ झालेली आहे. त्यास काहीही शास्त्राधारच नाही, आहे. ती फ़क्त निव्वळ व निव्वळच अफ़वा. त्यावर कोणी भरवसा ठेऊ नये. ह्याचीच विशेषेत्वेकरुन नोंद भाविकांनी घ्यावी.
२) आगामी दक्षिण भारतात सिंहस्थ कुंभमेळा फ़क्त श्री श्रेत्र त्र्यंबकेश्वरीच अंदाजे ह्याच १४/०७/२०२७ ते ११/०८/२०२८ तारखांच्याच दरम्यान होणार आहे. बाकी अन्य कोठेही होत नाही, ह्याचीच विशेषेत्वेकरुन नोंद भाविकांनी घ्यावी.
३) श्री श्रेत्र त्र्यंबकेश्वरी सध्या बोगस अनाधिकृत पुरोहित आम्ही येथिल सर्व विधी करुन देतो, असे भासवुन काहीतरी विधी करुन भाविकांची दिशाभुल करतांना आढ्ळतात. आपण अन्य गुरुजींकडे विधी करण्यास जात असाल तर अगोदर भरवसा करण्याचे अगोदर त्यांचे कडे कोणत्या त-हेचे रजिस्ट्रर अधिकारपत्र व लोगो आहे का ह्यांचीही अधिकृत खात्री करवुन घ्यावी.
महत्त्वाच्या विशेष सुचना
१) 8/05/2024 ते 1/06/2024 ह्या दरम्यान गुरूचा अस्त आहे.
२) 06/05/2024 ते 25/06/2024 ह्या दरम्यान शुक्राचा अस्त आहे.
३) कुठचाही विधी करतांना आपली विधीवर श्रध्दा ठेवणे अति-आवश्यक आहे. कारण हे श्रध्द्रचे फळ आहे. जर विधीवर श्रध्दा नसल्यास कोणताही विधी करू नये. हीच न्रम विनंती.
४) त्र्यंबकेश्वरी येतांना गुरूजींनी सांगितलेल्या वस्तु न चुकता सर्व गोष्टी आठवणीने जरूर आणाव्यात. कपडे चांगले आणावेत, म्हणजे ब्राम्हण त्याचा उपयोग करतील अथवा गरजु लोक करतील हाच त्या मागचा मुळ उद्देश.
५) ज्या-ज्या व्यक्तिच्यां कुंड्लीत दोष सांगितलेला आहे, त्या प्रत्येकाला विधी स्वतंत्रच करणे आवश्यक आहे. (अर्थात जरी दोघे सख्खे भाऊ असले तरीही वा पिता वा पुत्र असो. त्या प्रत्येकाला विधी स्वतंत्र करण्याचा अधिकार आहे. )
६) कुठल्याही तर्हेची वायफळ चिकित्सा जास्त न करता आपली शंका विचारावी. टिंगल वा कुचेष्टा या भावनेतुन प्रश्न विचारून स्वत:चा अपमान करून घेऊ नये, ही न्रम विनंती.
७) आपणास वेळोवेळी दिल्या जाणा-या सुचनारुपी नियमांचे आपण पालन करावे. कारण नियम हे विधीच्या दॄष्टीने महत्वाचे असल्याने त्या कोणत्याही त-हेची सुट आपणास मिळेलच ह्या अपेक्षेवर कोणीही अवलंबुन राहु नये.
८) नारायण-नागबली, त्रिपिंडी श्राध्द, कालसर्प शांती हे तिन्ही विधी वेगवेगळे स्वतंत्र आहेत. त्यांचा एकमेकांशी काहीही काडीमात्र संबंध ह्याची विशेष नोंद घ्यावी.
९) तसेच आजार असलेले व आजारी व्यक्तींनी वैद्यकिय सल्ल्यानेच कुठच्याही पुजेस बसावे. आप आपली औषधे व पथ्य-पाणी स्वत:चे स्वत: पाळावे. गरज वाटली तर तशी पूर्वकल्पना गुरूजींना द्यावी.
१०) प्रति व्यक्ती पावसाळयात छत्री वा रेनकोट तसेच हिवाळयात शाल, स्वेटर, कानटोपी आठवणी पूर्वक आणावीत.
११) स्त्रियांची मासिक पाळीची अडचण कोणत्याही विधीत येणार नाही, असाच मुहूर्त १५ दिवस अगोदर गुरूजींना कळवावे.कारण आपणास दिल्या जाणा-या खोलीसाठीचे आरक्षण करण्यास अडचण व आपणास त्रास होणार नाही.
१२)ज्यांना संततीसाठी नारायण - नागबळी विधी करावयाचा आहे, त्यांना त्यासोबत त्रिपिंडी श्राध्द सुध्दा करणे आवश्यक आहे. संततीसाठी गुरू व शुक्र अस्तांमध्ये नारायण - नागबळी व त्रिपिंडी श्राध्द विधी करणे टाळावेच.
१३) गणपतीत ७ दिवस व नवरात्रीत १० दिवस तसेच दिवाळीत ५ दिवस आम्ही कोणतेही धार्मिक विधी करणार नाही, ह्याची नोंद घ्यावी
१४)आपल्या स्वत:च्या घरात भाऊ-बहिण, मुल-मुलीचे शुभकार्य (उपनयन वा विवाह झाले असल्यास तसेच आपल्या स्वत:च्या घरात आजोबा, आजी, वडिल, आई, भाऊ, भावजई ह्यापैकी कोणाचाही मृत्यु झाल्यास एका वर्षापर्यंत नारायण - नागबली विधी करता येणार नाही.
१५) नारायण - नागबळी हा विधी अडीच तासांचा असा तीन दिवसांचा विधी आहे, तसेच त्रिपिंडी श्राध्द, कालसर्प शांती हा अडीच तासांचा असा एक दिवसांचा विधी आहे.