ऐतिहासिक आणि पौराणिक कथा

त्रिशंकु राजाची कथा

पूर्वी सुर्यवंशातर्गत इक्ष्वाकु कुळात, त्रिशंकु नावाचा राजा होऊन गेला. त्याच्या वडिलांचे नाव पृथृ असे होते. त्यास अशी इच्छा उत्पन्न झाली की, आपण सदेह स्वर्गात जावे, म्हणून तो आपले घराण्याचे जे कुलगुरु वसिष्ठ यांचेकडे जाऊन त्यांस त्याने विनंती केली आहे की, 'स्वर्गकामो यजेत्' - त्यास स्वर्ग मिळावा अशी इच्छा असेल त्याने यज्ञ करावा, असे जर आहे तर मला स्वर्गात जाण्याची इच्छा आहे, परंतु माझी, मृत झाल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती नसुन, या देहानेच (पंचभौ‍तिक) स्वर्गास जावे अशी आहे. आपण यज्ञाचे आचार्यत्व करून तो यज्ञ, मजकडून करवावा, त्यावर वसिष्ठ ऋषींनी सांगितले की, या जड देहाने स्वर्गास जाता येत नाही. तेथील शरीर तेजोमय असतात. तेव्हा तुझी इच्छा पूर्ण होणे शक्य नाही, म्हणून हा यज्ञ मी तुझयासाठी करू शकत नाही असे वसिष्ठांनी सांगितल्यावर त्यांच्या मुलासही त्रिशंकूने विचारणा केली परंतु वसिष्ठ ऋषिंच्या मुलानेही नकार दिल्यावर त्रिशंकुस राग येऊन त्याने सांगितले की, मी दुसरा गुरू करून त्यांच्याकडून यज्ञ करवून घेईन असे म्हटल्याबरोबर वशिष्टांनाही, योग्य मार्गदर्शन करीत असता हा ऐकत नाही असे वाटून त्यांना कोप आला. त्यांनी त्रिशंकुस असा शाप दिला की तू तेजोहीन होशील त्या शापाने त्रिशंकु निस्तेज होऊन गेला परंतू त्याने आपला हट्ट न सोडता तो ऋषी विश्वामित्रांकडे गेला व आपली इच्छा त्यांना सांगून त्यांस आचार्यत्वाची प्रार्थना करून त्यांच्या संमतीने यज्ञास सुरुवात केली.

परंतू यज्ञीय हर्विर्भाग घेण्यास देव येईनात. तेव्हा यज्ञाने काम होत नाही असे विश्वामित्रांच्या लक्षात आल्यावर त्यांनी असे ठरविले की, आपण आज पर्यंत जी तपश्चर्या केली त्या पुण्याईच्या दानाने, त्यास आपण स्वर्गात पाठवू कारण आपण दिलेला शब्द पूर्ण केलाच पाहिजे. असा विचार करून त्रिशंकुच्या हातावर सर्व पुण्याईचे उदक (पाणी) सोडून त्यास विश्वामित्रांनी स्वर्गात पाठविले स्वर्गाचा राजा इंद्र जो त्यास स्वर्गात घेईना. त्यास स्वर्गातून खाली ढकलण्यात आले. तो खाली मस्तक करून कोलमडला त्याने विश्वामित्रांची प्रार्थना केली तेव्हा विश्वामित्रांनी त्यास आकाशात अधांतरी स्थिर केले व इंद्रास सांगितले की, 'तु यास स्वर्गात न घेतल्यास मी स्वतंत्र स्वर्ग निर्माण करून त्यात त्यास ठेवील. तेव्हा देवेंद्र व विश्वमित्र यांच्यामध्ये विचार विनिमय होऊन, त्रिशंकुस नक्षत्रामध्ये जागा देण्यात आली.

अशारितीने त्रिशंकुच्या जिवात्म्यास योग्य गती मिळाली नाही म्हणून त्याचा मुलगा जो हरिश्चंद्र याने हा विधि केला असे दालभ्य संहितेत त्रिशंकु स्वर्गकोमेन हरिश्चंन्द्रैण वै कृत असे वर्णन आहे.

भीष्माचार्यांची कथा

एकदा भीष्माचार्य आपले दिवंगत वडिल जे शंतनू यांना उद्देशून श्राध्द करीत असतांना त्यास पिंउ देण्याकरिता जमिनीवर दर्भमुष्टि परसलेल्या होत्या. त्या खालील जतिनीतून त्यांच्या वडिलांचा स्वर्ण कंकणयुक्त हात वरती आला तो हात पाहिल्यानंतर, भीष्माचार्यांना शंका उत्पन्न झाली की पिंडदान हे या हातावर करावे की दर्भावर करावे. त्यावर त्यांनी असे सांगितले की शास्त्रप्रामण्यावरुन मी पिंडदान करीत आहे, त्यामुळे माझे वडिलांचा हात प्रत्यक्ष पिंड घेण्यास भूमीतुन वर आला ते शास्त्र सांगत आहे की, पिंडदान हे दर्भावरच केले पाहिजे असे सांगून त्यांनी पितरास उद्देशून पिंड न देता दर्भावरच पिंडदान केले, हे पाहून वर आलेला हात अदृश्य होऊन शंतनूने भीष्मास सांगितले की, मी तुझी शास्त्रावरील श्रध्देची परीक्षा पहाण्याकरीताच हात वर केला होता. परंतू शास्त्रात सांगितल्याप्रमाणे श्रध्देने तू जे दर्भावर पिंडप्रदान केलेस, त्यामुळे मला पूर्ण तृप्ती मिळाली आहे असा कथाभाग महाभारतात अनुशासन पर्वात आहे. (अध्याय ८४ श्लोक १४ पासून) याप्रमाणे अनेक उदाहरणे याविषयी आहेत. ती सर्व इतिहासात देता येणे शक्य नाही.

ज्ञानेश्वर महाराजांची कथा

निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज वगैरे संत-मंडळी भारतातील तीर्थयात्रा करीत घटप्रभा, मलप्रभा, ऋष्यमूक पर्वत, किष्किंधा इत्यादी तीर्थक्षेत्रावरून प्रवास करीत कार्तिकस्वामींच्या सुप्रसिध्द अशा कुमार तीर्थावर आले. तेथे शिख पंथी मुख्य साधू नानक यांची गाठ पडली ते साधू पूर्ण सिध्द होते. त्यांनी ज्ञानेश्वर वगैरे संत-मंडळींचा सत्कार करून आपले सिध्दीचे सामर्थ्याने, पंचपक्वानाचे भोजन तयार केले. तेव्हा नामदेव म्हणाले 'कार्तिकस्वामीचे' कुमारतीर्थावर जर आपण त्यांचा प्रसाद घेत आहोत, तर त्यांना समक्ष बोलावणे योग्य होणार आहे. तेव्हा निवृत्तीनाथांनी त्या साधूकडे बोट केले.

ही गोष्ट त्या साधूच्याही लक्षात आली. ते म्हणाले, 'मी कार्तिकस्वामींना बोलावण्यास समर्थ नाही. कारण परलोकी गेलेले लोक परत येत नाहीत. त्यांना उद्देशून केलेल्या श्राध्दादिक क्रिया हे थोतांड आहे अशी माझी समजूत आहे. पण ज्ञानेश्वरांनी पैठण येथे एका ब्राम्हणाचे पितर जेवावयास बोलावले असे मी ऐकले आहे. तेव्हा त्यानीच जर कार्तिकस्वामींना बोलावले तर मी श्राध्दादिक क्रियेविषयी माझे मत बदलेल व श्राध्द करावे या गोष्टीवर विश्वास ठेवीन' तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की 'श्राध्दादिक क्रिया यथायोग्य असून त्या यथासांग झाल्याच पाहिजेत. कारण वासनात्मक देह सुक्ष्मावस्थेत शिल्लक राहतात. त्यातून त्यांना पुढे नेण्याकरिता वेदांनी श्राध्दादिक क्रिया सांगितल्या आहेत. त्या योग्य नाहीत म्हणणे म्हणजे स्वत:ला दृष्टी नसल्यास जगात सूर्य नाही असे म्हटल्याप्रमाणे आहे. हे संत सिध्द आहेत. त्यांची इच्छा कार्तिकस्वामी भोजनास यावे अशीच आहे. तेव्हा नामदेवा, आपण कार्तिकस्वामींना आणावे. तेव्हा नामदेव म्हणाले, ज्ञानाच्या इच्छेप्रमाणे भक्तिला पावले टाकणे भाग आहे, असे सांगून ज्ञानेश्वर महाराजांना साष्टांग नमस्कार करून कार्तिकस्वामीना बोलावण्यास गेले आणि थोडया वेळात परलोकवासी असलेल्या कार्तिकस्वामींना घेऊन परत आले.

कार्तिकस्वामींचे सह सर्व संत मंडळींचे मोठया थाटाने भोजन झाले. रात्री नामदेवांचे किर्तन झाले. त्यावेळी कार्तिकस्वामी हजर होते. हिंदूच्या या सनातन श्राध्दसंस्थेविषयी त्या गुरू नामक या सिध्द पुरूषास परमादर वाटला यात काही तरी रहस्य आहे अशी त्यांची खात्री झाली व त्यांनी आपले ग्रंथात या श्राध्दसंस्थेविषयी आदर व्यक्त करून आपले सर्व अनुयांयानी श्राध्दाविषयी करावा असे आपले मत प्रदर्शित केले. नानकांच्या ग्रंथामध्ये नामदेवांच्या भेटीचे वर्णन आहे.

उपसंहार

वेद पुराणादि ग्रंथात नाना तर्‍हेचे रोग संकटे यांचे निरसनार्थ विधिविधाने सांगितली आहेत. आपण केवळ निसर्गाचाच जरी विचार करू लागलो, तरी असे दिसते की, निसर्गातही कार्य करण्याची शक्ती दृष्टीस पडते. चंद्रोदय झाला असताना समुद्राचे पाणी वर खेचले जाते म्हणजे समुद्रास भरती येते. तसेच वर फेकले गेलेले पदार्थ (कार्य) पृथ्वीच्या आकर्षण शक्ती (कारण) टपकन खाली पडतात. कार्यकारण भावांचा विचार करतांना असे दिसते की, काही कार्य व त्यांची कार्य सर्वसाधारण मानवी बुध्दीस आकलन करता येतात. तर काही मानवी बुध्दीस अनाकलनीय राहतात. केवळ ती कार्ये व त्यांची कारणे आकलन करता येत नाहीत, म्हणून ती आकलन करण्यास अशक्य किंवा त्यांचा संपूर्ण अभावाच आहे असे म्हणणे तर्कसंगत वा बुध्दिवादास धरून होणार नाही. ही जी कार्ये वा कारणे जी सर्वसाधारण मानवी बुध्दिच्या आवाक्या बाहेरची असतात, त्यांचा सुक्ष्म शोध करून त्यांची साखळी जमविण्याचे काम वेद व शास्त्रे करतात व नारायण - नागबली यांसारख्या विधी - विधानाने ती प्रकाशित केली जातात.

सांप्रमहि हजारो लोक नारायण - नागबलीचे विधान अपत्यप्राप्तीसाठी अगर काही हेतूपूर्तीसाठी करीत असतात. हा विधी म्हणजे सकाम श्राध्द आहे. हे पुस्तकात निर्दीष्ट केले आहेच. नाग व नारायण यास उद्देशून केलेले सकाम श्राध्द म्हणजेच त्यास उद्देशून अति श्रध्देने दिलेल्या विधीयुक्त अन्नाहार, द्रव्य, तिल, दर्भादि यास नारायण - नागबली असे म्हणतात. हा विधी शास्त्रप्रामाण्य व परंपरा यास धरूनच त्र्यंबकेश्वर येथे केला जातो. हे विधान पुत्रप्राप्ती, जिवित, संततीस आरोग्य दुर्धर शरीर पीडेचा नाश, योगक्षेम व्यवस्थित चालणे, मृतात्म्यास इष्ट गति मिळणे, पिशाच्च पिडेपासून मुक्तता इत्यादी हेतूचे पूर्तीसाठी करतात. वर सांगितलेल्या हेतूंचा विचार करता असे दिसते की, अनपत्येतेचे कारण उभय पती पत्नीस अगर एकात असणारे शारीरीक दोष हे जसे असू शकते, तसेच उभय पती पत्नी सर्वथा दोषरहित असून जर अनपत्यता असेल तर काही अदृष्ट कारण असण्याची शक्यता आहे. ही गोष्ट गृहित धरणे योग्यच आहे. अदृष्ट कारण परंपरा निश्चित करतांना पुष्कळ लोकांना येणारा अनुभव समान हीच एक मात्र कसोटी असू शकते व त्यावरून विधीविधानाचा युक्तपणा ठरविला जातो. याही विचारसरणीत सुक्ष्म दोष राहतो, तो असा की व्यवहारात पुष्कळ वेळा असे आढळते की एखादा माणूस एखाद्या गणिताचे उत्तर बरोबर सांगतो. परंतु त्याची उत्तर आणण्याची पध्दत मात्र चुक असते. तसाच प्रकार इतर ठिकाणी केलेल्या याहि विधीबद्दल असण्याची शक्यता आहे. म्हणजे विधान केल्यानंतर अनपत्यता दूर झाल्यास विधानाने निर्दिष्ट केलेली अदृष्ट कारण परंपरा शंभर टक्के अचूक असे सांगणे संपूर्णतया तर्कसंगत होणार नाही.

दुसर्‍या बाजूने विचार करता असे दिसते की, चुकीच्या पध्दतीने एखाद्या गणिताचे उत्तर चुकून जरी बरोबर आले तरी प्रत्येक वेळी असा प्रकार न घडता उत्तर चुकण्याची शक्यता जास्त, म्हणून सर्वसाधारण समान अनुभव आल्यास कारण परंपरायुक्त असे म्हणणे चुक ठरणार नाही. वरील विवेचनावरून एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. येथे केलेल हे विधान अनुभवसिध्द व पूर्व परंपरेला धरूनच केले जाते. सांप्रत अगोदर कारण परंपरेचा विचार करणे हे प्रयत्नवाद व बुध्दिवाद यास सोडून आहे असे मानण्यात येते. असे मानणे एकांगीपणाचे निदर्शक आहे. केवळ गोचर कारण परंपरेचा विचार करणे जसे इष्ट नव्हे तसेच केवळ अगोचर कारणाचाच विचार करणे हेही इष्ट नव्हे. दोघांचाही विचार करणे तर्कास धरून आहे. एकाच कारणावर अवास्तव भर देणे म्हणजे रोगापासून मुक्तता हे प्रधान ध्येय अभिप्रेत असता केवळ विशिष्ट वैद्याचेच औषध घेऊन रोगमुक्त होण्याचा आग्रह धरणे होय. याप्रमाणे सारासार विचार पध्दतीने विचार करून हे नारायण नागबलीचे वेदप्रणीत विधान आपले वंशवृध्दीकरता, संसारात येणार्‍या अपरिहार्य अडचणी दूर होणेकरीता भाविक व श्रध्दांळू जणांना शास्त्रकरांनी अत्यंत सुक्ष्म दृष्टीने विचार करून मार्गदर्शन म्हणून सांगितलेले आहे.

careful
apps-banner
यजमान आणि यात्रेकरुकरीता महत्त्वाची माहिती   
© Copyright 2015 All rights reserved at Shikhare B. S.