कालसर्प योग शांतिबाबतही बराच गैरसमज आहे, असे का आम्ही सांगत आहोत. ह्याचे कारण सविस्तर देत आहोत, ते पुढील प्रमाणे- ह्या कडे कृपया कोणी दुर्लक्ष करू नये.
तिथी, वार, नक्षत्र, योग, कारण ही पाच अंग म्हणजेच पंचाग. ह्याच पाच अंगापैकी जो जन्माचे वेळेला काही अंगाचां जो काही दोष राहातो तोच दोष घालविणारा विधी म्हणजेच जनन शांति. जनन शांति म्हणजे ज्याप्रमाणे आपण जसे अंगावरील वापरलेले खराब कपडे धुतो नंतर तेच स्वच्छ कपडे आपण जसे परत परिधान करतो, तसेच जनन शांतिचेही तसेच नियम आहेत. ती जनन शांति करण्याची खरे वय आहे, जन्म झाल्यापासून ११ किंवा १२ व्या दिवशी करावी, नंतर त्या बाळाचे बारसे (नामकरण) करावे. पण आज-काल बाळाच्या जन्माच्या आनंदात त्या बाळाचे जन्माचे वेळी जनन शांति आहे की नाही ह्याची चौकशी न करता बारसे (नामकरण) केले जाते. त्यामुळेच पुढे काही त्या बाळाचे कोणत्याही आयुष्यात काही त्रास झाल्यावर (उदा- आरोग्य, शिक्षण, उच्च्ा शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विवाह आदी त्रास ) आपण त्याची जन्मपत्रिका घेऊन कोणत्याही कुड-बुडया ज्योतिषाकडे जाऊन त्यास काही वरील अडचणीबाबत आपण त्यास काही दोष-त्रास आहे का असे विचारतो. मग तो कमी अभ्यास असलेला ज्योतिषी आपणांस विचारतो की, ह्यांची कालसर्प, अमावास्या, मूळ, ज्येष्ठा आदी शांति आहेत. त्या शांति कधी केलेल्या नसल्यास त्यास आयते कारण मिळते की ह्याची शांति केल्या नसल्यानेच हा त्रास उदभवलेला आहे. त्यामुळेच ह्या शांति करण्यास भाग पाडतो. शांति केल्यानंतर काही २० ते २५ टक्के जणांस त्याचा जरूर फायदा- लाभ होतो. पण ह्याचा अर्थ हाच की कावळा बसण्यास व त्याचवेळी झाडाची फांदी मोडण्यास एकच वेळ ह्या म्हणी प्रमाणेच हेही आहे. पण हे मानने सर्वथा निरर्थक व भ्रम निर्माण करण्यासारखेच आहे. आमचा अनुभव असा आहे की, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येणारे भारतातूनच नव्हे तर जगाच्या कोणत्याही भागातून येणारे १०० पैकी ८० टक्के येणारे लोक गैरसमजुतीनेच येथे येत असतात ह्यास आम्ही काय म्हणावे त्याचे उत्तर आहे अज्ञान. अजुन आमचा अनुभव असा आहे की, सर्व शांति पुजा करूनही काही जणास फायदा न झाल्यास तेच लोक ज्यांनी पुजा करण्यास सांगितली त्यांना न विचारता तेच लोक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरूजींनाच विचारतात की, आम्ही जी काही आपणाकडे शांति-पुजा केली त्याचा आम्हास काहीच उपयोग झालाच नाही. ह्यास उत्तर काय? ह्याला उत्तर एकच की जर एखाद्या डॉक्टरने जर एखादी गोळी दिल्यावर औषध दुकानदाराचे काम आहे की लिहून दिल्या प्रमाणे गोळया देणे. जर त्या दिलेल्या गोळयांचा जर काही दुष्परिणाम झाल्यास त्याचा नेमका दोष कोणाचे माथी मारावा, ह्यात नेमका दोषी कोण गोळ्या लिहुन देणार्या डॉक्टर की लिहून दिल्याप्रमाणे औषधे देणारा औषध दुकानदार हा निर्णय सुज्ञ व योग्य विचार करणार्या विचारवंतानीच ठरवावा.