ह्या आपल्या सर्व भारतखंडात म्हणजेच हिंदूस्थान देशात हिमालयपर्वतापासून तहत रामेश्वरापर्यंत अनादी कालापासून मुख्यत्वें वैदिक धर्म (आर्यधर्म) प्रवृत्त राहून आर्य लोकांचे बुध्दिवैभवाने व शौर्याने त्या धर्मातील भूतदया, विज्ञानमार्ग, अहिंसा, नैसर्गिकनिती, दया, शांति, परोपकारबुध्दि, दातृत्व, कौशल्य व कृतज्ञता वगैरे प्राणीमात्रांच्या जीवनास अनिंद्य मार्गांनी ऐहीक व पारत्रिक जी सुखोत्पादक मूलतत्वे त्यांचे योगाने सर्व जगत् - भर ग्राह्य होऊन तो पसरला असावा, असे हल्ली जे इतर राष्टांत नव-नविन शोध लागत आहेत. त्यात मूर्ती व देवालये (शंकरादी देवांची) सापडतात, त्यावरून ह्या धर्मात सगुणोपासनेचा अभ्यास करून मग निर्गुण परब्रम्ह्माची उपासना करण्यास सुलभ जाऊन त्याची प्राप्ती होते असे एक तत्व आहे, तीच मूर्ती- पुजा होय. म्हण्जे त्या परमेश्वराने आपणांस पंचत्वांचे रूपाने निर्माण केले आहे त्या पंचतत्वांची रुचिवैचित्र्याप्रमाणे अलौकिक मूर्ति बनवून तिचे ठायी ईश्वराची भावना करून त्याचे (ईश्वराचे) आपणांवर झालेले उपकांराबद्दल आपलेसारखे सुखोपभोगाच्या वस्तु समपर्ण करून कृतज्ञता दाखविणे यास ''पुजन'' असे म्हणतात किंवा ''सगुणोपास्ति'' असेही म्हणतात. तात्पर्य हीच तत्वे प्राचिन काळी सर्व जगत् भर चालू होती, असे अनुमान उत्पन्न्ा होत आहे. आर्यलोक ईश्वराचे ''अस्तित्ववादी'' असल्याने कृत, त्रेता, द्वापर या तीन युगांत श्रुति व स्मृति यांस अनुसरून चातुर्वण्यापैकी ब्राम्हण, क्षत्रि, वैश्य ह्या द्विजसंज्ञक तीन वर्णांचा धर्म कृतयुगांत परेमेश्वराचे ध्यान, त्रेतायुगात तत्संबंधाने त्याने निर्माण केलेले अलौकिक व महत्तेजस्वी तत्व जे ''अग्नि'' तद्वाराने यजन (यज्ञ यगादि कर्मे) व द्वापारयुगात वर सांगितल्याप्रमाणे सगुणोपास्ति यथाविधी पुजन व्यवहार अशी विभागरुपाने कर्तव्य कर्मे होती. शूद्रांस ब्राम्हणादि वर्णत्रयांची सेवा करणे असे होते. परंतु द्वापाराचे शेवटी कलियुगात आरेभास पुराणोत्क धर्माचे प्राबल्य वृध्दिगंत होऊन प्रथमचे तीन वर्णांनी आपापली कर्मे श्रुति व स्मृतिस अनुसरून करून वेदरुप नामस्मरण करावे, असे चातुर्वर्णास साधारण म्हणूनच भक्तिरूपाचे एक तत्व उत्पन्न झाले असावे, असे भारत व भागवत या दोन पुराणाचा मेळ घालून पाहिले असता दिसून येते. असो या धर्मातील तत्वांपैकी कृतज्ञता हे एक तत्व आहे. असे वा आधी सांगितलेच आहे. ज्या परमेश्वराने पथ्वी, आग, तेज, वायु व आकाश ही पंचतत्वे निर्माण करून त्यांचे योगाने ही सर्व स्थावर जंगमात्मक सृष्टी निर्माण केली आहे त्या परमेश्वराविषयी व त्या पंचतत्वांविषयी केवळ पशुवत उदरपूर्तीचाच उद्योग न करिता ज्ञानवान प्राणी जो मनुष्य ह्याने आपले ठिकाणी कृतज्ञताबुध्दि धरली असता त्यास ऐहीक सुखे प्राप्त होऊन पारलौकिक सुख असा जो मोक्ष म्हणजे जन्ममरण संस्कृतीचा वियोग त्याचीही प्राप्ती होते असे पुढे जे विषयोपपादन करणार त्यावरून स्पष्ट दिसून येईल. वर जशी अग्निरूप तत्वांची उपासना सांगितली तसेच दुसरे तत्व आप (उदक) देवता त्या तत्वास प्राणीमात्रांचे जीवन अशी संज्ञा आहे. त्या देवतेचे महत्व व गुण यांचा विचार करून वेदांत व विशेष करून पुराणात देवते संबंधाने कृतज्ञता दाखविण्याचे चातुर्वर्ण्यांसही सर्वसाधारण मार्ग सांगुन फलही सांगितलेले आहे, ते असे
हे गंगे, हे यमुने, हे सरस्वती व हे क्षिग्र गमन करणारे म्हणून ''शुतुद्रि'' व जिला ''वेरावती'' म्हणतात व जी वक्रगतीने वाहणारी व जी तेज:पुज म्हणून ''परूष्णि'' म्हणतात, असे परूष्णेसह नद्या हो तुम्ही आमचे या स्तोत्राकडे लक्ष द्यावेत म्हणजे आमचे स्तवनरुप सेवेचा स्वीकार करावा, तसेच जिचा वर्ण कृष्ण आहे, म्हणून जिला ''आसिन्कि'' म्हणतात. तिच्याशी सहवर्तमान जी तु वायुचे योगाने पापांचे क्षालन करणारी आहेस म्हणजेतुजवरील वारा अंगास लागल्याबरोबर पाप दूर होते. असे ''मरूद्रुधे'' व सरलगतीने वाहणारी आहेस, म्हणून ''आर्जीकीये'' जीचे पात्र विस्तृत आहे, म्हणून वितस्ता व सुंदर उदकोनी भरून वाहणारी गंगा ''सुषोमा'' ह्यांशी सहवर्तमान व जी तु मोक्षाची इच्छा करणारे जे वसिष्ठ ऋषि त्यांचे भावपाश दूर केलेस, म्हणून तुला ''विताट'' म्हणतात. तीतुहे जे आम्ही स्तवन करीतो ते श्रवण कर असे ऋषिंनी मंत्रात व यास्काचार्यांनी आपले निरुक्त ग्रंथात निर्वचन रुपाने वर्णन केलेले आहे, ते असे
ज्या ठिकाणी सिताsसिता म्हणजे म्हणजे गंगा व यमुना ह्या दोन नंद्याचा संगम झाला आहे असे जे प्रयोगतीर्थ ''वेणी'' अशी संज्ञा आहे. तेथे हे बुध हो जी कोणी मनुष्ये यथाविधी स्नान करीतात. त्यास स्वर्गप्राप्ती होते. इतकेच नाही तर तेथे त्यांचे देहावसन झाले म्हणजे त्यांना मोक्षप्राप्तीही होते. तात्पर्य - अपोदेवात्मक ज्या गंगादि पुण्यनद्या त्यांचे स्तवन व यथाविधी स्नान यांचे फल मोक्षपदापर्यंत जाऊन पोहोचल्याचे वर्णन वेदांत दिले आहे. तसेच ''भारत'' व ''मत्स्यपुराणांत'' ही.
यो दरिद्रैरपि विधी: शक्य: प्राप्तु जनेश्वर । तुल्यो यज्ञफलै: पुण्यैस्तं निबोध महीपते ।।
ऋषिणां परमं गुह्यमिदं भारतसत्तम । तीर्थभिगमनं पुण्यं यज्ञैरपि विशीष्यते ।।
अर्थ - हे राजा ह्या कलियुगात चातुर्वर्णास सर्वसाधारण परमेश्वर प्राप्तीचा मार्ग अतिशय द्रव्य, अत्यंत शरीरकष्ट व अप्रतिम विद्वत्ता यांचे साह्याने फलप्राप्ती करून देणारी जी पूर्वकालीन यज्ञयागादिक कर्मे त्यांच्या तो बरोबरीचा काय? परंतु त्यांचेपेक्षाही विशेष फलदायक व सुगमतर असा तीर्थाभिगमन (तीर्थयात्रा करणे) हा आहे. असे सांगितले आहे. स्कंदपुराणातही श्वेतराजा, चंद्रसेन भपति व विष्णुदत्त वैश्य यांस मोक्षप्राप्ती झाल्याची कहाणी आहेत. पुढे श्रुति, स्मृति व पुराणे ह्यास अनुसरूनच हेमाद्री, माधव निर्णयसिंधु आदि निबंधात व महाभीमांसकाचार्य नारायण भट्टी, यांचे ''त्रिस्थलीसेतु'', ''तीर्थेशेखर'' व ''तीर्थदर्पण'' वगैरे ग्रंथात तीर्थे यांची महात्म्ये ० यात्राविधी सांगितले असून कौस्तुभ, प्रयोगपारिजात, नारायणभट्टी, विश्वनाथभट्टी, महेश्वरभट्टी, गोपीनाथभट्टी, व संस्कारभास्कर वगैरे याज्ञिकीग्रंथात तीर्थायात्राविधीचे पांक्त करणिय प्रयोग दिलेले आहेत. तेव्हा हा खटाटोप करण्याचे प्रयोजन तरी काय? असा प्रश्न उत्पन्न होतो. याकरिता प्रस्तुत विषयाकडे वळु. त्यांचे उत्तर असे आहे की, पुर्वी वेदमंत्रात गंगानदी आली आहे, तिचे दोन प्रकारचे स्वरुप आहे. विध्याद्रीचे दक्षिणभागी जी गंगा तिला गौतमी अथवा गोदा असे म्हणतात. ती ब्रम्ह, विष्णु व शिवात्मक म्हणजे त्रिदैवत आहे व ती ब्राम्हणाने म्हणजे गौतम महर्षीनी आपले तप:सामर्थ्यांने शंकरास प्रसन्न करून घेऊन स्वत:चे व प्राणीमात्रांचे पाप दूर करणार्थ कृतयुगात या भूतलावर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पुण्यपावन तीर्थराज जे श्रीमत् - कुशावर्ततीर्थ यांत आणून ते पुनित झाले. विध्याद्रीचे उत्तरभागी भगिरथ राजाने जी गंगा आणली तिला ''भागिरथी'' असे म्हणतात. स्कांद व ब्राम्हपुराणांत तशाच कथा आहे ती अशी-
कृते लक्षद्वयातीते मांधातरि शके सति । कूर्मे चैवावतारे च सिंहस्थे च बृहस्पतौ ।।
माघ शुक्ल दशम्याम् च मध्यान्हे सौम्यवासरे । गंगासमागता भूमौ गौतम प्रार्थिता सति ।।
महापापादियुक्तांनाम् जनानाम् पावनायच् । औदुंबरतरोर्मूले ययौ प्रत्यक्षताम तदा ।।
तसेच गौतम कृतार्थ झाले असे समजून गोदावरी अंतर्धान पावल्यावर सर्व ऋषि व मुनिगण जगताला पावनकत्रीं ही ह्या भूततलावरून निघून गेल्याने आत्तांच्या लोकांचे पापाचे क्षालन कसे होईल अशी त्यांस काळजी पडून गौतमांची त्यांनी प्रार्थना केली. त्यावरुन गौतमांनी गोदावरीची पुन्हा स्तुति करून ती ''कुशावर्त'' तीर्थात प्रकट झाली त्यासंबंधाने ''स्कंद'' पुराणातील आणखी एक आधार देत आहे तो असा. -ही.
गुप्ता तलांतरेणैव गोदा सा त्रपयान्विता । तामालोक्य मुनिम प्राह सोम: सोमार्थशेखर: ।।
मुने तनुकुशाग्रेण भूमौ द्रक्ष्यसि गौतमी । कुशेनावर्तिता मंत्रैश्चिद्रसा मुनिना यत: ।।
कुशावर्तमिती खातम् तीर्थतत्रातिपातन् । तत्र द्दष्टा महागंगाप्रकटाम् परमेश्वरी ।।
तस्यां स्नात्वाsति संतुष्टा देवासुरमनीश्वरा: ! मुने कुशं समादाय इत आहवानयस्व भो ।।
तथा चक्रे स हि मुनिस्तत: प्रादुर्बभूव सा । कुशावर्त ततस्तीर्थ देवानामपि दुर्लभम् ।।
असे सर्व गोदावरीमध्ये अतिपावन व पुनरुत्पत्तिस्थानाभूत कुशावर्त तीर्थ आहे. ब्रम्हपुराणात ब्रम्हदेव व नारद यांचे संवादांत असं आहे की,
महेश्वरजटा स्थाया आपो देव्यो महामते । तासां च द्विविधो भेद आहर्तु: पद कारणात् ।।
एकोंशो ब्राम्हणे - नात्र व्रतदानसमाधिना । गौतमेन शिवं जुज्य आर्हतो लोकविश्रुत: ।।
अपरस्तु महाप्राज्ञ क्षत्रियेण बलियसा । आराध्य शंकर देवं तपोभिर्नियमैस्तथा ।।
भगीरथेन भूपेन आर्हर्तोशोsपरस्तथा । ए वम। द्वैविध्यमभवद् गंगाया गां गता यत: ।।
यावरून स्कंद व ब्रम्ह पुराणाचे आधारे गोदा व भगिरथी या दोन्हीही नद्या गंगापदव्याच्य असून एकरूप आहेत व गोदेत तर विशिष्ट स्थलाधिकरणक अतिपावन व गोदा मूलस्नानभूत व मुख्य असे ''कुशावर्ततीर्थ'' आहे. याकरिता गोदायात्रा निमित्ताने यात्रा करणे पुढील प्रतिपादनावरून सिध्द होत आहे. भगिरथसंबंधाने प्रयाग, काशि व गया या त्रिस्थलीसंबंधाने तीन स्थलांशी जोडून यात्रा असतांनाही यात्राक्रमाचा घोटाळा न करता त्रिस्थलीसेतुकरांने यथातथ्य विवेचन केले आहे. परंतु गंगापदव्याच जी दुसरी गौतमी जिला वृध्दगोदा अशी संज्ञा आहे. तिच्या यात्रेसंबंधाने आधुनिक ग्रंथकार ''गोदाविवेकादर्श'' व ''गोदानिर्णयचंद्रिका'' कार यांनी यात्राक्रम विशेष तीर्थाचे माहात्म प्राचीन शास्त्राधार व त्यास धरून अलौकिकाविगीत शिष्टाचार व रुढी यांचे संबंधाने अनेक विषयांत स्पर्धा व चर्चा करून आमचे सारखे लोकांत घोटाळयात घातले आहे. त्यात गोदानिर्णयचंद्रिकाकार हे वैय्याकरण व बहुश्रुत असल्याने त्यांनी तर परंपरागत शास्त्राधार यांचे भलतेसेच अर्थ करून नैसर्गिक, न्यायसिध्द व प्रति-प्रदोक्त विशिष्टाधिकरणक तीर्थमाहात्म व तत्संबंधी यात्राविधी याबद्दल काहीतरी स्वकपोलकल्पित हेतु व त्यांचे पुष्टीकरणार्थ लागु नसणारे धर्मशास्त्र न जाणणारे जुने व अभिनव पूर्व परस्परविरोधी आधार देऊन शास्त्रानुसार चालत आलेल्या रुढींचा अनादर किंवा अवहेलना करून सामान्य जणांवर (धर्मशास्त्राबाबत अनभिज्ञ जणांवर) आपले अपुर्या विद्वतेचा व अल्पबुध्दिपणाचा अतिबहुश्रुतपणाने कोटीक्रम करून अल्पबुध्दिचा पगडा बसविण्याचा प्रयत्न काही ''नाशिक'' स्थित अल्बुध्दि जिवीधाकर आपले पांडित्य दाखवून करू पहात आहेत. म्हणूनच अलिकडे आधुनिक ग्रंथकारांच्या ग्रंथांचे मान्यतेबद्दल विद्यान लोकांच्या संमती घेण्याची चाल पडली आहे. त्याप्रमाणे या ग्रंथकारांचे विद्वतेचा विचार केला असता यांचे ग्रंथातील गुणाबगुण पाहून मान्यता (प्रमाणपत्र) देण्याचा ज्यांस अधिकार व ग्रंथकाराचे विद्वतेचे मानाने नाही असे जे बहुतेक नाशिकस्थ वृत्युपजीवी व ज्यांचे या ग्रथरचनेपासून निवळ हित आहे, त्यांनीच केवळ ह्या ग्रथांचे आंरभी आपली संमती निदर्शित केल्याचे दिसत आहे. खरोखरच विचार केला असता अशा विद्वान कोअक्रम करून लिहिणारे ग्रंथकाराचे परिश्रमाबद्दल व ह्या ग्रंथाचे गुणावगुणांबद्दल ह्या ग्रंथसंबंधाने का बरे आमच्या सारख्यांनी मूक अगर बधिर होऊन बसावे? तेव्हा ह्याबद्दल सुज्ञ व मर्मज्ञ लोच आता स्वत:च विचार करतील.
सदरचे दोन ग्रंथकाराचे (खरे व खोटे) मतभेदाचा निर्णय ''पुराणे'' व ''स्मृत्या'' यांस अनुसरून जे प्राचीन निबंध व अर्वाचीन धर्मशास्त्रीय ग्रंथ याचे आधाराने दोहोतही खरे काय आहे याविषयी प्रसंगानुसार विषयोपादन करून चार ओळी विद्वज्जांपुढे ठेवून त्यांचा त्यांनीच नि:पक्षपाती पणाने विचार करावा इतकाच ह्या लेखाचा मुळ खरा हेतू आहे. वादांचे विषयांचे जागी दोन्हीही ग्रंथकारांचे प्रतिक घेऊन त्या विरुध्द शास्त्राधार देऊनच बरीच चर्चा करणे खर्याची बाजु धरण्यास भाग पाडले आहे. काल संबंधाने परस्परविरोधी अशी सदरचे ग्रंथकारांनी ग्रंथ जुळणीकरीता प्राचीन म्हणून दिलेली वचने अभिनव असल्याचे व्यक्त करून दाखविण्याकरीता यत्न करणे आवश्यक झाले आहे. तीर्थे त्यांची माहात्मे व यात्राविधी बद्दल वर दर्शित केल्याप्रमाणे अनेक प्राचीन व अर्वाचिन ग्रंथ प्रचारात असल्याने व गोदाविवेकादर्श व गोदानिर्णयचंद्रिकेत त्याबद्दलचे पाक्त व साधार विवेचन दिले असल्याने यात्राविधीची विशेषस्थले खेरीज करून ते होईल तितकेच संक्षेपाने दिले आहे. या लेखाद्वारे कुणाची उगीचच निंदा अगर स्तुति करण्याचा आमचा मूळ उद्देश नसून विषयोपउरन स्पष्ट व सुगमतर व्हावे इतकाचयाचा आगंह आहे.
२०१५ साली सिहंस्थ कुंभमेळयाचे दिवस सुरू होत असल्याने गोदायात्रा खरोखर शास्त्रत: शक्य असेल तर कोठे झाली पाहिजे हे समजण्याकरिता हे विवेचन केले आहे. कालगतीने नविन ग्रंथ निर्माण करनू यात्रेकरु लोकांची कशी गैरसमजूत करण्यात येते, हे दाखविण्याकरिता मराठी जाणणारे आबाल वृध्दास हे दिग्दर्शने केलेले आहे.
ह्या लेखात विसंगतपणा व प्रयोगरचना ह्यासंबंधी दोष होणे संभवनीय आहे, परंतु ते न होण्याविषयी शक्य तितका प्रयत्न केला आहे. तर मग वर दर्शित केलेले दोषांबद्दल कोणी निंदा केल्यास तिजविषयी कमीपणा वाटण्याचे भय अथवा कारण काही असे आम्ही समजतो.
संकलन : भूषण सांभ शिखरे (ज्योतिष पंडित), त्र्यंबकेश्वर, नाशिक.