जन्म मरणाचे रहस्य वैचारिक लेख

मनुष्य प्राण्याचा जन्म आणि मृत्युचे कोडे रहस्यात्मक आहे. आपल्या जुन्या जगप्रसिध्द धार्मिक पुस्तकांमधून, वेद, उपनिषद् आणि पुराणातुनही ह्या विषयावर सविस्तर सुसंगत माहिती दिलेली आहे.

भगवान श्रीकृष्णांनी तर श्रीमद् भागवतगीतेतही लिहून हेच सांगितलेले आहे की जन्माला आलेला एक दिवस निधन पावणार आणि जो मृत्यु पावला तो पुन: जन्माला येणार. जन्माच्या संदर्भात आपल्याला पुराव्याची वा स्पष्टीकरणाची गरज भासत नाही. कारण जगात रोज असंख्य माणसे जन्म घेतात आणि मृत्युही पावतात, परंतु पुर्नजन्मासाठी आपल्याकडे तसे पुरेसे पुरावे नाहीत आणि काही गोष्टी आपण पारंपारिक शास्त्राच्या सांगण्यावरून मान्य करतो आपले परंपरागत धर्मशास्त्र असे सांगते की मनुष्य प्राण्याचा आत्मा हा आकाराने अत्यंत सुक्ष्म असतो म्हणुन तो आपल्याला साध्या डोळयांनी दिसत नाही.

महर्षि कपिलांनी नमुद केलेले आहे की मनुष्य देह तो त्याला त्याच्या माता-पित्यांकडून मिळालेला आहे तो त्रिगुणात्मक आहे. त्यामुळे मनुष्याच्या आत्म्यामध्ये तीन अतिसुक्ष्म 'अद्श्य' देह असतात. जेव्हा मनुष्य मयत होतो तेव्हा त्याचे दृष्य शरीर नष्ट केले जाते परंतु अंतरातील अदृश्य देह मात्र तसाच राहातो. त्याची सुटका वा मुक्तता ब्रम्हज्ञाना 'अध्यात्मिक शक्ति' विना ही होऊ शकते जर तो देह सत्वगुणी असेल तर तो श्रेष्ठ श्रेणीत म्हणजे देवाच्या जवळ जातो आणि तेथेच निवास करतो. रजोगुणी देह पुन: मनुष्य जन्म घेतो ह्या ठिकाणी देह म्हणजे नश्वर शरीर नसून अजरामर आत्मा आहे असे स्पष्ट श्रीमद् भगवदगीतेमध्ये सांगितले आहे.

श्रीमद् भगवदगीतेमध्ये एक कथा आहे विष्णुच्या पहारेकर्‍याचे नाव जयविजय होते एकदा त्याच्या चुकीमुळे मुनी सनकांनी त्याला शाप दिला की तुझे राक्षस म्हणून तीन जन्म होतील. भगवान ब्रम्हाने आपल्या इच्छा शक्तिच्या बळावर विश्वनिर्मिती करण्यापूर्वी मुनी सनकांना निर्माण केले होते, परंतु सनक मुनी नेहेमीच पाच सहा वर्षाच्या बालकांसारखे वस्त्ररहित रहायचे. एकदा मुनी सनक भगवान विष्णुंच्या राजमहालात त्यांच्या दर्शनासाठी गेले. जय विजयने त्यांना ओळखले नाही कारण ते वस्त्रहिन शिशुरूपात होते आणि त्यामुळेच जयविजयने मुनी सनकांना श्री विष्णूच्या महालात येऊ दिले नाही. लहान मुलाला जर त्याच्या मनासारखे मिळाले नाही तर तो चिडतो हट्टाला पेटतो. तसेच झाले आणि मुनी सनकांनी चिडून जय-विजयला शाप दिला की तुझा तीन वेळा राक्षस जन्म होईल, हे ऐकल्यावर जयविजयने भगवान विष्णूला साकडे घातले त्यावर श्री. विष्णू म्हणाले तुझ्या तीन राक्षस जन्मानंतरच तुला तुझे पुर्वीचे अस्तित्व प्राप्त होईल. ह्यावरून असे सिध्द होते की मृत मनुष्याचा पुर्नजन्म होतो. नाहीतर मुनी सनकांनी जयविजयला तीन जन्माचा शाप दिलाच नसता. मनुष्याचे तीन गुण (रज, तम, आणि सत्व) मनुष्य स्वभावाची मुख्य कारणे आहेत.

सत्वगुणी माणसांची परमेश्वरावर नितांत श्रध्दा आणि विश्वास असतो. रजो गुणी माणसे यक्ष अथवा राक्षस म्हणजे बलशक्तिच्या जोरावर श्रध्दा ठेवतात आणि तमागुणी मनुष्य भुत-प्रेतांवर विश्वास ठेवतात. जर मनुष्याची वागणुक सदाचारी असेल, त्याच्या आयुष्यात जर पापांना थारा नसेल तर असली व्यक्ती आपला जन्म पुढच्या जन्मीही विसरू शकत नाही. पुर्वजन्माची आठवण त्याला येते असे गीतेमध्ये म्हटले आहेत.

श्राध्दाचे नियम सुध्दा पुनजर्न्माच्या तत्वावरच आधारीत आहेत. जेव्हा पुत्र आपल्या मृत पित्याला पिंड देतो तेव्हा तो पितरांना अवश्य पोहोचतो. पुष्कळांच्या मनात ह्या संदर्भात आशंका आहेत त्या अशा. जर आपले पुर्वज त्यांच्या गुणांनुसार पुर्वजन्म घेत असतील तर आपण अर्पण केलेल्या वस्तू त्यांच्या पर्यंत कशा पोहोचतात आणि त्यांचा त्यांना काय उपयोग होतो. तसे पाहिले तर आपण आपल्या पुर्वजांना प्रत्यक्ष काहीच देत नाही. आपण ब्राम्हणांना काय द्यायचे ते देतो आणि ते त्या वस्तुंचा उपयोग करतात. हे अगदी बरोबर आणि खरे आहेत की जगात अशा कित्येक गोष्टी वा घटना आहेत ज्यांच्या सत्येविषयी आपल्याजवळ पुरावे नाहीत तरीही प्रत्यक्षात मात्र आपण त्यावर विश्वास ठेवतो, श्रध्दा ठेवतो. आपली श्रध्दा ही कुठेतरी कोणावरतरी असायलाच हवी. जरी ह्या विश्वासातुन वा श्रध्देतुन लौकिक अर्थाने आपणांस काहीही मिळाले नाही तरी आपले नुकसान तर काहीच होत नाही. आपल्या पारंपारिक शास्त्रात जसे नमुद केले आहे तसे आपण आपल्या प्रत्यक्ष जीवनातही पहातो की श्राध्दासमयी ठेवलेला कावळयाचा घास कावळे पटकन घेतात आणि इतर कावळयांनाही घेण्यासाठी काव काव करून बोलावितात ह्यालाच कदाचित मृत माणसाची आपल्या वारसाकडून भोजनाकरवी इच्छाची तृप्ती असेल असे म्हटले तर काय वावगे आहे ?

careful
apps-banner
यजमान आणि यात्रेकरुकरीता महत्त्वाची माहिती   
© Copyright 2015 All rights reserved at Shikhare B. S.